दारू पिण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका, असे म्हटल्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. कारेगाव येथील घटना, पतीला अटक महिलेचे माहेर कौठा तालुका नेवासा
दारू पिण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका, असे म्हटल्याचा राग आल्याने पतीने पत्नीच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. या घटनेत पत्नी ठार झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. सुशीला भवार (वय ३२) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
शिवनाथ कारभारी भवार (वय ४०, रा. कारेगाव) हा बुधवारी (दि. १८) रात्री साडेआठच्या दरम्यान मोटारसायकलवर जाऊन दारू पिऊन आला. त्यानंतर पुन्हा ट्रॅक्टर घेऊन दारू पिण्यासाठी निघाला. हे लक्षात आल्याने पत्नी सुशीला भवार यांनी पती शिवनाथ यास दारू पिण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका, असे म्हणत जाण्यास विरोध केला. पत्नीच्या विरोधामुळे शिवनाथ याचा राग अनावर झाला. त्याने पत्नीच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यात ती ठार झाली.
याबाबत मयत सुशीला शिवनाथ भवार यांचा भाऊ मल्हारी हरिभाऊ दरंदले (रा. कौठा, ता. नेवासा) यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिवनाथ भवार याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कलम १०३ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे.पुढील तपास पो.नि. दशरथ चौधरी हे करत आहे
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.