नेवासा – बनावट मेडिकल सर्टीफिकेटच्या आधारे मृत्यूपत्र – तयार करून घेतल्याप्रकरणी देडगाव येथील दोन जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील देडगाव येथील श्रीधर कुंडलिक मुंगसे यांनी त्यांचे नातू भगवान कैलास मुंगसे व बाजीराव कैलास मुंगसे यांच्या नावावर देडगाव येथील शेत गट नं. ४३० मधील १ हेक्टर ७९ आर हे क्षेत्र मृत्यूपत्र करून त्यांना दिले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ज्ञानदेव श्रीधर मुंगसे (रा. देडगाव) यांनी सह जिल्हा निबंधकांकडे अर्ज केला, सदर अर्जाच्या चौकशीचे आदेश दुय्यम निबंधक (सब रजिस्टर) अंबादास जगन्नाथ पवार यांना देण्यात आले.
त्याअनुषंगाने त्यांनी, चौकशी केली असता, सदर मृत्यूपत्र करतेवेळी वरील लोकांनी श्रीधर कुंडलिक मुंगसे (वय ८५) यांचे वैद्यकीय अधिकारी (ग्रामीण रुग्णालय, मिरी) यांच्याकडील फिटनेस सर्टिफीकेटबाबत मिरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय
अधिकाऱ्यांना पत्र पाठवले, त्यावर तालुका आयोग्य अधिकारी डॉ. भगवान उत्तम वराडे यांनी दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, मिरी येथे श्रीधर कुंडलिक मुंगसे या नावाचे कोणीही व्यक्ती वैद्यकीय तपासणीसाठी आलेली नाही. तसेच रजिस्टरला याबाबत नोंद नाही, असे लेखी पत्र दिले, त्यामुळे श्रीधर कुंडलिक मुंगसे यांची जमीन भगवान कैलास मुंगसे व बाजीराव कैलास मुंगसे यांच्या नावावर करतेवेळी श्रीधर कुंडलिक मुंगसे यांचे बनावट मेडिकल तपासणी सर्टीफिकेट दिले असल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी दुय्यम निबंधक (सबरजिस्टर) अंबादास जगन्नाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भगवान कैलास मुंगसे व बाजीराव कैलास मुंगसे यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२०, ४६७, ४६८, ३४ व नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.