ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

खत

नेवासा तालुक्यातील खते दुकानदारांचा आक्रमक पवित्रा

सोनई –रासायनिक खत कंपनीकडून प्रत्येक खतासोबत काही ना काही लिंकिंग दिले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना खते वाटप करताना प्रचंड अडचणी येत असून प्रत्येक कंपनीसोबत दिले जाणारे लिंकिंग तातडीने बंद करावे अन्यथा नेवासा तालुक्यातील खत पुरवठादार असोसिएशन आपले खत परवाने तहसीदार यांचेकडे जमा करतील .असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सध्या रब्बी हंगाम चालू असल्यामुळे खताची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र खत कंपन्या खतासोबत लिंकिंगची सक्ती करत आहेत. सध्या युरिया ,१८:४६:०० १५:१५:१५. ,१०:२६:२६ अशा प्रकारच्या इतर खतांसोबत अनावश्यक खते औषधे लिंकिंगची सक्ती केली जात आहे.

खत

सदर अनावश्यक लिंकिंग औषधांची आवश्यकता नसतानाही खत दुकानदारांना खरेदी करण्याची सक्ती कंपन्याकडून केली जात आहे. एखाद्या खत विक्रेत्याने अनावश्यक खते ,औषधे घेण्यास नकार दिल्यास संबंधित दुकानदारास आवश्यक तो खतपुरवठा केला जात नाही. जाणीवपूर्वक त्यांची अडवणूक केली जाते . त्याचबरोबर आवश्यक असणाऱ्या खताचे भाडेही संबंधित खत विक्रेत्याकडूनच वसूल केले जात आहे. त्यामुळे खत विक्रेते अडचणीत सापडले असून आलेली खते त्यासाठी लागणारे भाडे धरून खत विक्री कशी करायची हा मोठा प्रश्न खत दुकानदारापुढे पडला आहे. खताबरोबर आलेले लिंकिंगची सक्ती शेतकऱ्यांना केल्यास शेतकरी खत दुकानदारांवरच नाराज होऊन खत दुकानदार अडवणूक करतात अशी भावना शेतकऱ्यांमध्ये झाली आहे . त्यामुळे खत व्यवसाय अडचणीत आला आहे .

खत

त्यामुळे आपण या संदर्भात संबंधित खत कंपन्यांशी संपर्क साधून सदरची लिंकिंग बंद करावी अशी मागणी नेवासा तालुका खतपुरवठादार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे यासंबंधीचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले असून नेवासा पंचायत समितीचे कृषी अधिकारी, नेवासा तालुका कृषी अधिकारी ,नेवासा तहसीलदार यांना सदर निवेदनाची प्रत देण्यात आली असल्याचे तालुका संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सावंत [रस्तापूर ] यांनी सांगितले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण सावंत ,माजी सभापती रावसाहेब कांगुणे, जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश सोनवणे,बाबासाहेब खिल्लारी,राहुल मूनोत,कमलेश नहार,अमृत उभेदळ,सुहास टेमक, तान्हाजी मोरे ,विक्रम बेल्हेकर, डॉ किशोर शेजुळ,निलेश कदम,विजय चोरडिया,अजित चव्हाण,लखन देशमुख,गणेश धीर्डे,प्रवीण इंगळे आदींसह तालुक्यातील खत दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

खत

रासायनिक खता सोबत देण्यात येत असलेली लिंकिंग बंद करण्यासंदर्भात 15 जानेवारी 2025 पर्यंत निर्णय झाला नाही तर तालुक्यातील सर्व रासायनिक खत विक्रेते आपल्या खतांचे परवाने तहसीलदार यांच्याकडे सोपवतील.
– प्रविण सावंत, अध्यक्ष नेवासा तालुका कृषी असोसिएशन

खत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खत
खत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!