तालुक्यातील सलाबतपुर या गावाची यात्रा आज वेगवेगळ्या गोष्टीमुळे यात्रा ओळखली जाते व प्रभावित होत असते परंतु सलाबतपुर यात्रा ही जुगाराच्या अड्डा म्हणून ओळखली जात आहे याला नेवासा पोलिसांचा पूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय ही यात्रा जुगाराचा अड्डा बनल्याचे बोलले जात आहे.
नेवासा तालुक्यामध्ये नावलौकिक असलेली सलाबतपुर येथील तवकल शाहावली बाबा यांच्या यात्रेच्या निमित्ताने युवकांना घरून पैसे दिले जातात यात्रेच्या खर्चासाठी परंतु या जुगाराच्या गल्लीमध्ये युवक रमला जातो व त्यामध्ये यात्रेला आणलेले पैसे जुगाराच्या अड्ड्यामध्ये खर्च करून युवक हा नैराश्याच्या छाया मध्ये लोटला जातो या यात्रा उत्साह मध्ये नेवासाच्या पोलिसांच्या वतीने एक-दोन पोलीस तैनात केले जातात परंतु तेही बघ्याची भूमिका घेत असतात.
तसेच सलबतपुर मध्ये जुगारच्या अड्डे सह या अवैधरित्या दारू गांजा आदी नशेच्या वस्तूंचाही विक्रीचा धंदा सरास चालू असताना पाहावयास मिळत आहे नेवासा पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने हा जुगाराचा अड्डा यात्रा उत्साह मध्ये चालू असल्याचे हे सर्वसामान्य नागरिकांमधून मधून बोलले जात आहे नेमके पोलीस काय करत आहेत व कोणाच्या आशीर्वादाने हा जुगाराचा अड्डा , नशा जन्य पदार्थ, दारू, गांजा,यात्रेमध्ये कसे चालू आहेत याची शहानिशा होणे गरजेचे आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.