जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर विहिरे शाळेचा विद्यार्थी किलबिल गटात हस्ताक्षर स्पर्धेत इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कु . साईदीप विलास पुंडे या विद्यार्थ्यांने हस्ताक्षर स्पर्धेत शेवगाव तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . अगदी थोरांनाही लाजवेल असे सुंदर व मोत्यासारखे अक्षर काढून साईदीपने तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवला .
त्याच्या या नेत्रदिपक यशासाठी वर्गशिक्षक अल्ताब बागवान तसेच सहशिक्षक भरत कांडेकर , खेडकर सुनिता , वैशाली खोसे व आईवडील सर्वांनी मार्गदर्शन व प्रयत्न केले व मोलाचा वाटा उचलला . जिल्हा परिषदेच्या शाळेतील एवढे सुंदर अक्षर असू शकते याचे आश्चर्य पालक वर्ग व पाहणारे प्रत्येक जण करत आहेत .ही बाब नक्कीच शाळेसाठी तसेच निंबेनांदूर गावासाठी .मोठी अभिमानाची व गौरवास्पद गोष्ट आहे.
साईंदीप याचे मुख्याध्यापक भरत कांडेकर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक गटविकास अधिकारी अजित बांगर , गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते ,शिक्षण विस्तार अधिकारी डॉ . शंकर गाडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ केंद्रप्रमुख सुभाष नन्नवरे तसेच मीरा केदार मॅडम आदींनी अभिनंदन केले पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या .
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.