आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मंगळवार दि. २३ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य शंतनु हापसे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर संस्थेच्या सदस्या ॲड.अलकाताई जंगले,नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोरजी जोजार, शिक्षणप्रेमी फक्कडराव तनपुरे, प्राचार्य रावसाहेब चौधरी, प्राचार्या सुरेखा पारखे, पर्यवेक्षिका सुनिता दिघे, ज्येष्ठ अध्यापक सुनिल धस, अनिल भणगे आदी मान्यवर उपस्थित होते.

सीबीएसई स्कूल

जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या रेसिडेन्शियल हायस्कूल नंतर ग्रामीण भागातील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा हे पहिले विद्यालय आहे. त्या अंतर्गत चालवण्यात येणारे ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक दृष्ट्या उत्तम प्रगती करत आहे. सर्व पालक व शिक्षणप्रेमींच्या सहकार्याने भविष्यात येथे सीबीएसई स्कूल सुरू करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष शंतनु हापसे पाटील यांनी केले.

सीबीएसई स्कूल

बालकांमधील गुणवत्ता व त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे महत्त्वाचे काम येथील शिक्षिका करत असून त्यांच्यामुळे विद्यालय व संस्थेचा लौकिक वाढत असल्याचे मत ॲड. अलकाताई जंगले यांनी व्यक्त केले. सध्या शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती चिंतनीय होत असून शिक्षकांना विद्यार्थी घडवण्यासाठी अधिकाधिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांची सुयोग्य जडणघडण होण्यासाठी समाजाने शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे सांगून किशोरजी जोजार पाटील यांनी स्नेहसंमेलनासाठी ५००१ रुपयांची देणगी दिली.

सीबीएसई स्कूल

शिक्षणप्रेमी फक्कडराव तनपुरे यांनी आपण ज्ञानोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून विद्यालयाने केलेल्या प्रगतीबद्दल समाधान वाटत असल्याचे सांगितले तसेच ११०० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन त्यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. विविध गाण्यांवर थिरकणारी चिमुकल्यांची पाऊले आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाने पालक हरखून गेले. या कार्यक्रमासाठी नेवासा शहर व परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सीबीएसई स्कूल

स्वागत व प्रास्ताविक समन्वयक अर्चना कोरडे यांनी केले. संजय आखाडे, अर्चना कोरडे, मोनिका शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका अश्विनी देशमुख, आश्विनी मरगळ, पूजा सोनवणे, रोहिणी धानापुणे, मोहिनी शिंदे, शोभा चौधरी, मिरा भागवत यांनी परिश्रम घेतले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सीबीएसई स्कूल
सीबीएसई स्कूल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सीबीएसई स्कूल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!