ग्रामपंचायत
प्रशासकराज

नेवासा – तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने या सर्व ग्रामपंचायतीवर ८ तारखेला प्रशासकराज सुरू झाले आहे. गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी ५९ ग्रामपंचातीवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. दोन वर्षापासून २६ ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. त्यामुळे प्रशासकाच्या हाती कारभार असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या ८५ वर गेली आहे. आता तालुक्यात केवळ २९ ग्रामपंचायतींमध्येच निवडून आलेले सदस्य व पदाधिकारी काम पाहत आहेत.

प्रशासकराज

मागील आठवड्यात मंत्रिमंडळाने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा अध्यादेश काढलेला आहे. आदेशामधील सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी आपल्या पदाचे मूळ कामकाज सांभाळून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ व ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ व त्यांच्या अनुषंगाने सर्व नियम, अधिनियम, अधिसूचना, शासननिर्णय व परिपत्रके मधील तरतुदीनुसार नेमून दिलेल्या ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून कामकाज करावे. तसेच कर्तव्य पार पाडताना झालेल्या गैरवर्तणूक अथवा कर्तव्यात दुर्लक्ष केलेले आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेशात म्हटले आहे.

प्रशासक नियुक्तीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अधिकार संपुष्टात आल्याने विकासात्मक व आर्थिक अधिकार प्रशासकाकडे असणार आहेत. या काळात पाणीपट्टी-घरपट्टी वसुलीसह विकास कामे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणीकडे प्रशासकाला लक्ष द्यावे लागणार आहे.

प्रशासकराज

दोन वर्षांपासून प्रशासक असलेली २६ गावे-

खामगाव, अंतरवली, खेडले काजळी, बेलपांढरी, लोहराबाडी, लेकुरवाळी आखाडा, चिलेखनवाडी, महालक्ष्मी हिवरे, धनगरवाडी, नेवासा बुद्रुक, गिडेगाव, नांदूरशिकारी, पाथरवाला, गोपाळपूर, राजेगाव, गोगलगाव, शिरसगाव, सुकळी खुर्द, गोमाळवाडी, तामसवाडी, गणेशवाडी, बडुले, वंजारवाडी, घोडेगाव, झापवाडी, जायगुडे आखाडा.

नव्याने प्रशासक नियुक्त झालेली नेवासा तालुक्यातील ५९ गावे व प्रशासक

बेलपिंपळगांव (बी. ए. कासार, विस्तार अधिकारी कृषी), बहिरवाडी (बी. ए. कासार विस्तार अधिकारी, कृषी), बाभुळखेडे (जी. पी. सवाई, कनिष्ठ अभियंता सा.बा. उपविभाग, नेवासा), बऱ्हाणपूर (ए. एस. दहातोंडे, कनिष्ठ अभियंता जि.प.ल.पा. उपविभाग नेवासा), बेल्हेकरवाडी (ए. ए. सोलाट, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सा.बा. उपविभाग नेवासा), बकुपिंपळगांव (ए. व्ही. इंगळे, विस्तार अधिकारी), भेंडा बुद्रुक (जी. पी. सवाई, कनिष्ठ अभियंता सा.बा. उपविभाग, नेवासा), भालगाव (आर. ओ. ठाकरे, विस्तार अधिकारी ए.बा. वि.से.यो.), चांदा (एस. एस. महांडुळे, कनिष्ठ अभियंता सा.बा. उपविभाग नेवासा), दिघी (पी. जी. वाघ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सा.बा. उपविभाग, नेवासा), देवगाव (जी. डी. व्यवहारे, विस्तार अधिकारी), देवसडे (व्ही. आर. तागड, कनिष्ठ अभियंता सा.बा. उपविभाग नेवासा), गळनिंब (जी. व्ही. मते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी), गेवराई (एस. एस. सोनवणे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ल.पा. उपविभाग नेवासा), गोणेगाव (पी.जी. वाघ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सा.बा. उपविभाग नेवासा), गोंडेगाव (व्ही. ई. सुडके, कृषी अधिकारी नेवासा), घोगरगाव (ए. व्ही. इंगळे, विस्तार अधिकारी), जेऊर हैबती (एस. एस. सोनवणे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक), जळके खुर्द (जे. जे. पट्टे, शाखा अभियंता सा.बा. उपविभाग, नेवासा), जळके बुद्रुक (ए. व्ही. इंगळे, विस्तार अधिकारी), कुकाणा (एन. डी. पाखरे, विस्तार अधिकारी), कारेगाव (ए. एस. दहातोंडे, कनिष्ठ अभियंता ल.पा. उपविभाग नेवासा), खेडले परमानंद (आर. एल. लांडे, विस्तार अधिकारी कृषी), खडका (श्री. आर. एल. लांडे, विस्तार अधिकारी कृषी), खरवंडी (श्रीमती एस. एन. चव्हाण, विस्तार अधिकारी), लोहगाव (यू. बी. शिंदे, विस्तार अधिकारी कृषी), लांडेवाडी (पी. जी. वाघ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सा.बा. उपविभाग नेवासा), म्हाळसपिंपळगाव (एस. एस. महांडुळे, कनिष्ठ अभियंता सा.बा. उपविभाग नेवासा), मक्तापूर (एस. व्ही. कळमकर, विस्तार अधिकारी शिक्षण), मंगळापूर (आर. आर. कडू, केंद्रप्रमुख गटशिक्षण कार्यालय नेवासा), मुरमे (व्ही. आर. तागड, कनिष्ठ अभियंता सा. बा. उपविभाग, नेवासा), मोरेचिंचोरा (व्ही. ई. सुडके, कृषी अधिकारी नेवासा), मांडेगव्हाण (पी. के. चव्हाण, कनिष्ठ अभियंता सा.बा. उपविभाग नेवासा), निंभारी (श्रीमती एस. एन. चव्हाण, विस्तार अधिकारी), नजिकचिंचोली ( आर ए. कुन्हे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सा. बा. उपविभाग नेवासा), नारायणवाडी (ए. ए. सोलाटस्थापत्य अभियांत्रिकी सहायक सा.बा. उपविभाग नेवासा), निपाणी निमगाव (यू, बी. शिंदे, विस्तार अधिकारी कृषी), नविन चांदगाव (एस. एस. सहायक प्रशासन
अधिकारी), पाचुंदा (व्ही. ई. सुडके, कृषी अधिकारी नेवासा), प्रवरासंगम (ए. व्ही. इंगळे, विस्तार अधिकारी), पिंप्रीशहाली (एस. एच. कदम, विस्तार अधिकारी), पुनतगाव (बी. ए. कासार, विस्तार अधिकारी कृषी), रांजणगाव (ए. एस. दहातोंडे, कनिष्ठ अभियंता ल.पा. उपविभाग नेवासा), रामडोह (एस. एच. कदम, विस्तार अधिकारी), सुरेगाव गंगा (आर. ओ. ठाकरे, विस्तार अधिकार) सलाबतपूर (जे. जे. पट्टे, शाखा अभियंता सा.बा. उपविभाग, नेवासा), शिंगणापूर (बी. ए. कासार, विस्तार अधिकारी कृषी), सोनई (एस. एस. महांडुळे, कनिष्ठ अभियंता सा.बा. उपविभाग नेवासा), शिंगवे तुकाई (जी. पी. सवाई, कनिष्ठ अभियंता सा.बा. उपविभाग, नेवासा), सुलतानपूर (ए. एस. दहातोंडे, कनिष्ठ अभियंता ल.पा. उपविभाग, पं.स. नेवासा टोका (ए. व्ही. इंगळे, विस्तार अधिकारी), तेलकुडगाव (एस. एच. कदम, विस्तार अधिकारी), तरवडी (पी. जी. वाघ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सा. बा. उपविभाग नेवासा), उस्थळ दुमाला (एस. एस. भदगले, सहायक प्रशासन अधिकारी), उस्थळ खालसा (आर. ओ. ठाकरे, विस्तार अधिकारी), वाटापूर (एस. एम. शेळके, केंद्रप्रमुख गटशिक्षण कार्यालय), वांजोळी (व्ही.ई. सुडके, कृषी अधिकारी नेवासा), वरखेड (व्ही. आर. तागड, कनिष्ठ अभियंता उपविभाग नेवासा), वाकडी (व्ही. आर. तागड, कनिष्ठ अभियंता सा. बा. उपविभाग नेवासा).

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रशासकराज
प्रशासकराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रशासकराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!