आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बिबट्या

कालवडीवर हल्ला करून रानडुकराची केली शिकार

चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात बिबट्याने पाळीव जनावरांसह वन्य प्राण्यांवर हल्ले सुरू केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. सुरेश पवार यांच्या वस्तीवरील कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले, तर परिसरात एका रानडुकराची शिकार केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुळा कॅनलगत चांदा शिवारात राहणारे सुरेश पवार यांच्या वस्तीवर बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही कालवड जोरजोरात ओरडल्याने पवार कुटुंबातील सुरेश पवार व इतर सदस्य घरातून बाहेर आले. त्यांना आलेले पाहताच बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. त्या बिबट्याने त्या कालवडीच्या गळ्याला जबड्यात पकडण्याचा प्रयत्न केल्याने, बिबट्याचे दात लागून कालवड जबर जखमी झाली आहे. या ठिकाणाहून बिबट्याला शिकार न मिळाल्याने त्याने परिसरातील रानडुकराची शिकार केली, असे त्या परिसरातील नागरिकांनी सांगितले.

एक बिबट्या पवार वस्तीजवळ शिकारीसाठी आला व त्याला कालवड न दिसल्याने तो जोरजोराने डरकाळी फोडू लागला. त्या दिवशी पवार वस्तीवरील नागरिकांना भयानक भीती वाटली. त्यामुळे या भागात बिबटे किती, हा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. एका बिबट्याने डुकराची रात्री शिकार केली, तर दुसरा बिबट्या दुसऱ्या दिवशी रात्री शिकारीसाठी पवार वस्तीजवळ आला; त्यामुळे बिबटे किती, हाच प्रश्न उभा राहिला आहे.

लवकरात लवकर वन विभागाने या भागात पिंजरा लावून या बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबटे जेरबंद झाले आहेत, परंतु चांदा शिवारातील बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला अपयश आले आहे, असे या भागातील शेतकरी आता बोलू लागले आहेत.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बिबट्या
बिबट्या
बिबट्या

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बिबट्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!