नेवासा-विश्व हिंदू परिषदेच्या दैनंदिनीचे सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय ट्रस्टी प्रभाकर शिंदे, प्रांत सहमंत्री अॅड. सतीश गोरडे, प्रांत मंदिर अर्चक संपर्क प्रमुख धनाजी शिंदे, विभाग मंत्री प्रा. सुनील खिस्ती, जिल्हा मंत्री विशाल वाकचौरे, प्रा. विश्वनाथ नाणेकर, विहिंप प्रखंड अध्यक्ष डॉ. अविनाश काळे, जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख प्रशांत बहिरट, कृष्णा परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.प. पू. रामगिरी महाराज यांनी
भारतीय कालगणना ही जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले.
तसेच बजरंग दलाच्या सेवा व संस्कार कार्याबद्दल गौरवोद्गार काढत समाजकार्याची दिशा अधोरेखित केली. दरम्यान, शिवजयंतीनिमित्त मध्यमेश्वर युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने नेवासा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखाव्यातील पुतळ्यास पुष्पगुच्छ, हार व फुले अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमास अॅड. सतीश गोरडे, धनाजी शिंदे, सुनील खिस्ती, विश्वनाथ नाणेकर, विशाल वाकचौरे, डॉ. अविनाश काळे, प्रशांत बहिरट आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा धर्मरक्षक कृष्णा परदेशी व अध्यक्ष संदिप म्हस्के यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







