नेवासाफाटा – २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन त्रिमूर्ती बी.एड.महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विज्ञानविषयक प्रास्ताविकाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्व प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विज्ञानाधिष्ठित विचारसरणी अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.स्मिता गोसावी, प्रा.गोरक्षनाथ सोनवणे, प्रा.मोईन सर, प्रा.उर्मिला पिटेकर, प्रा.कोमल केने व प्रा.प्रवीण गांगुर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.
याच दिवशी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या समन्वयक डॉ.अनुराधा गोरे यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. बी.एड.विद्यार्थ्यांनी त्यांना वृक्ष भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला, ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.विकास साळवे यांनी विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय विज्ञान दिनाची प्रतिज्ञा करून घेत विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







