आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
चंद्रग्रहण

नेवासा – यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी होणार असून महाराष्ट्रात चंद्र उगवत असतानाच ग्रहणाचा शेवटचा टप्पा पाहायला मिळणार आहे. खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक नैसर्गिक आणि सुरक्षित खगोलदृश्य असून ते साध्या डोळ्यांनी पाहण्यास कोणताही धोका नाही.

चंद्रग्रहण

या ग्रहणास दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुरुवात होईल. मात्र त्या वेळी चंद्र पूर्व क्षितिजाखाली असल्याने भारतातून ग्रहणाचा प्रारंभ दिसणार नाही. संध्याकाळी चंद्र उगवत असताना ग्रहणाचा शेवटचा भाग विविध शहरांतून काही मिनिटांसाठी पाहता येईल.

यंदाचे चंद्रग्रहण चूडामणी योगात होत असल्याचे पंचांगकर्त्यांनी नमूद केले आहे. पृथ्वीच्या दाट सावलीत चंद्र गेल्यावर त्याचा रंग काळसर-लालसर दिसतो. यालाच लोकप्रिय भाषेत ब्लड मून किंवा रक्तचंद्र म्हटले जाते. त्या रात्री आकाशात गडद लाल छटा दिसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ग्रहणाची समाप्ती सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात चंद्रोदयानंतर ते ६:४८ पर्यंतच ग्रहण दिसेल.

गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमांवर चंद्रग्रहणाबाबत विविध अफवा आणि भीती पसरवली जात आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, ग्रहण ही पूर्णपणे नैसर्गिक खगोलीय घटना आहे. शिक्षक आणि पालकांनी मुलांना प्रत्यक्ष हे दृश्य दाखवून त्यामागील विज्ञान समजावून सांगावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चंद्रग्रहण
चंद्रग्रहण
चंद्रग्रहण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चंद्रग्रहण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!