नेवासाफाटा (वार्ताहर): नेवासा येथील कै.विजयकुमार थावरे यांची नात पूजा सुहास थावरे हिने जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए च्या अंतिम परीक्षेत वयाच्या २२ व्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ही परीक्षा द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया, नवी दिल्ली (आयसीएआय) मार्फत घेण्यात आली होती. अथक परिश्रम, जिद्द, सातत्य आणि दृढ निश्चय यांच्या बळावर तिने हा मानाचा टप्पा गाठला आहे.

ती २०२१ मध्ये सीए फाउंडेशन व २०२२ मध्ये सीए इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाली होती. त्यानंतर तीन वर्षांची सीए आर्टिकलशिप अहिल्यानगर येथील M/s H S P S AND ASSOCIATES येथे पूर्ण केली. याच दरम्यान आयसीएआय च्या अहिल्यानगर शाखेतील विद्यार्थ्यांचे WICASA (Western India Chartered Accountant Student Association) चे उपाध्यक्ष पद भूषविताना, इन्स्टिटयूट च्या सहकार्याने पुजाने अनेक सामाजिक, शैक्षणिक नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले. या कालावधीत तिला सीए हृषीकेश धर्माधिकारी, सीए प्रसाद पुराणिक, सीए सुजय पानसरे आणि सीए सोमनाथ जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच एमसीए अकॅडेमीचे संचालक सीए पवनकुमार दरक आणि सीए शबनम हर्दवानी यांनीही संपूर्ण प्रवासात तिला सातत्याने मार्गदर्शन करत प्रेरणा दिली. पूजा हिने आपले बी.कॉम शिक्षण पेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर येथून पूर्ण केले असून सध्या त्याच महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. शैक्षणिक वाटचालीत तिने सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आपल्या या यशाचे श्रेय तीने आपले कुटुंबीय, सर्व मार्गदर्शक, आयसीएआय अहिल्यानगर शाखेतील पदाधिकारी यांना दिले असून त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे स्वप्न साकार झाल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







