नेवासा प्रतिनिधी:- लखन वाल्हेकर
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे नळ गेल्या १० ते १५ दिवसांपासून कोरडेच आहेत. ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे देवगाव वासियांना पिण्याच्या पाण्यासाठी कडाक्याच्या उन्हात भटकावे लागत आहे. ग्रामसेवक आणि सरपंच यांना वारंवार तक्रारी करूनही ते दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गावात पाणी पुरवठा सुरळीत नसल्यामुळे अनेकांना टँकरद्वारे महागडे पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्या या गावातील दलित वस्ती मध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या कडे ग्रामपंचायत कधी लक्ष देणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







