आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवजयंती

मक्तापूर- येथे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत समाज एकजुटीचा संदेश दिला.
कार्यक्रमात नेवासा फाटा मुकिंदपूरचे पोलीस पाटील आदेश साठे यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि जनतेसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. शिवरायांचे विचार आजच्या पिढीने अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुकाणू समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे यांनी समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी शिवजयंती आणि भीम जयंती एकत्रितपणे साजरी करण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधून समाजाला दिशा मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवजयंती


तसेच बादल परदेशी यांनीही आपल्या भाषणातून शिवरायांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करावी, हा शिवरायांच्या विचारांचा खरा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. शिवरायांच्या कार्याची माहिती देताच उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे घोषणाबाजी करत परिसर शिवमय केला.
या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे परिसरात शिवभक्तीचा आणि उत्साहाचा माहोल निर्माण झाला.


यावेळी मेजर गणेश शिंदे पोलीस पाटील आदेश साठे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झग रे आरपीआयचे शहराध्यक्ष पप्पू भाऊ इंगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मक्तापूरचे पोलीस पाटील सरपंच अनिल लहारे आयुष्य बापू नवघरे जोईल साळवे शिवसेना शिंदे मनोज झग रे अजय कोळेकर भरत काळे संचालक नेवासा भाऊसाहेब कांगणे अविनाश गोरक्षनाथ बर्डे राहुल जामदार रोहित जामदार विशाल बर्डे मयूर साळवे सचिन गायकवाड छबुराव बर्डे अशोक लोकस साळवे निवृत्ती सातपुते सुनील गोरे सुरज हिवाळे कादर शेख बादल परदेशी आबासाहेब शिरसाठ सागर सरोदे, भीमशक्तीचे पप्पू भाऊ कांबळे दत्तात्रेय कोळेकर सर महानता राजू गिरी महाराज दीपक बर्डे प ग्रामपंचायत सदस्य विजय भाऊ कांबळे प्रगत का शेतकरी लक्ष्मण बर्डे अमोल भागवत अक्षय मक्तापूर ग्रामस्थ ,शिवशक्ती भीमशक्ती एकलव्य मित्र मंडळ उपस्थित होते

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवजयंती
शिवजयंती
शिवजयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवजयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!