सोनई-देवस्थानातील शनैश्वर अनावश्यक कर्मचारी भरती व विश्वस्त मंडळाच्या कारभाराबाबत मुंबई धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्यासमोर मंगळवार सुनावणी झाली. आता त्यावर पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अधिवेशनात अनावश्यक कर्मचारी भरती व ऑनलाइन पूजा अॅप घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळातील अनावश्यक कर्मचारी भरती व मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढत मुंबई धर्मादाय आयुक्तांनी चौकशीसाठी विश्वस्तांना नोटिसा बजावल्या होत्या.

शनिशिंगणापूर देवस्थानवरील विविध आरोपांवर बाजू मांडण्यासाठी विश्वस्तांना मुंबई धर्मादाय कार्यालयाच्या अधीक्षक सीमा केणी यांनी कलम ४१ डी. नुसार नोटिसा बजावून विश्वस्त अथवा प्रतिनिधींमार्फत म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार तत्कालीन देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने मुंबई येथील विधिज्ञ अॅड. समीर जाधव व अॅड. इनामदार यांनी बाजू मांडली होती. यापूर्वी २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली होती. या प्रकरणाचा अंतिम निकाल १७मार्च रोजी लागण्याची आशा होती, पण मुंबई धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती यांनी आता २० एप्रिल रोजी सुनावणीची पुढील तारीख दिली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







