नेवासा फाटा – नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव येथील रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल (CBSE पॅटर्न) या शाळेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील सीबीएसई दहावीच्या परीक्षेत १००% टक्के निकाल लावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या या निकालाने शाळेच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेत आर्या मुकुंद हारदे हिने ९५% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ प्रतिक्षा अनिल निपुंगे (८९%), पार्थ प्रशांत मापारी (८१%), राजवीर गणेश परदेशी (७८%) आणि अर्पिता नरेंद्र आढाव (७७) यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा गौरव वाढविला. तसेच विविध विषयांमध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आपली गुणवत्ता सिद्ध केली.

विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास या त्रिसूत्रीमुळेच हे यश शक्य झाले आहे. शाळेने गुणवत्ता, शिस्त आणि सातत्य या मूल्यांचा अवलंब करून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम केले आहे.
या यशानिमित्त शाळेत छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील अंबाडे, प्रिन्सिपल पिटर बारगळ, डायरेक्टर अजित अंबाडे व निकिता अंबाडे, प्रि-प्रायमरी इंचार्ज मनीषा सिन्नरकर, देविदास कुटे तसेच सर्व शिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. डॉ. मुकुंद हारदे यांनी संस्थेचे अध्यक्ष, प्रिन्सिपल व सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल पटारे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा सिन्नरकर यांनी केले.
रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलने कायमस्वरूपी गुणवत्तेची परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली मेहनत पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांना नव्या उंची गाठण्याची प्रेरणा मिळणार असून शाळेचा गौरव अधिक वाढणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







