नेवासा –निघोज वरून नेवासा येथे आणलेल्या श्री मळगंगादेवीच्या घागरीचे व निघालेल्या पालखी मिरवणुकीचे शहरात फटाक्यांची आतषबाजी करत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मळगंगादेवी मंदिराचे रेणुकादास घोलप यांनी पालखी मिरवणुकीचे नेतृत्व केले.

नेवासा येथे एस टी स्टँड जवळ असलेल्या मळगंगा देवीच्या मंदिरापासून सायंकाळी ६.३० वाजता पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी निघोज येथून आणलेल्या श्री मळगंगादेवीच्या घागरीची व पालखीची सुवासींनीनी पंचारती ओवाळून पूजा केली. अग्रभागी झेंडा काठी, त्यामागे बॅण्डपथक, पुष्पांनी सजविण्यात आलेली मळगंगादेवीची पालखी, त्या मागे देवीच्या नावाचा जयघोष करणारे भाविक असे या पालखी मिरवणुकीचे स्वरूप होते. नेवासा शहरातील बसस्थानक, नगरपंचायत चौक, शहरातील मुख्य
पेठेतून पालखी काढण्यात आली.

पालखीचे नेवासेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करून दर्शन घेतले. घोलप परिवाराच्या वतीने देवीभक्त रेणुकादास घोलप, सुमनताई घोलप, परशुराम घोलप, लताताई घोलप, रामभाऊ घोलप, ज्योती घोलप, सचिन घोलप, जयश्री घोलप, सागर घोलप, वैशाली घोलप, शाम घोलप, ज्योती घोलप, संदीप घोलप, भारती घोलप यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. मळगंगादेवीच्या पालखी मिरवणुकीचा मळगंगादेवी मंदिर प्रांगणात झाल्यानंतर मळगंगा देवीच्या पालखीची संबळाच्या निनादात महाआरती करण्यांत आली. समारोप महाआरतीला अशोक गावडे, बाळासाहेब म्हसे, जनार्धन व्यवहारे, ओम घोलप, झेंडे मिस्तरी, राजू यादव यांच्यासह भाविक उपस्थित होते. उपस्थित भाविकांना आंबील महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री देवीचा जागरण गोंधळ कार्यक्रम पार पडला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







