नेवासा- तालुक्यातील तेलकुडगाव येथे जातीय वादातून उफाळलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मारहाण, दगडफेक, धमक्या आणि सामाजिक भेदभावाच्या आरोपांवरून १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाणे येथे २४ एप्रिल रोजी रात्री ऋखठ क्रमांक ०३१५/२०२६ नोंदविण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे.

तक्रारदार बंडू अशोक साळवे (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ एप्रिल रोजी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीच्या वादातून परिस्थिती चिघळली. त्याच रात्री अजय खरात यांच्या वेल्डिंग दुकानावर काही आरोपींनी दगडफेक करून दुकान बंद पाडल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर १६ एप्रिल रोजी साळवे यांच्या ङ्गगुरुदत्त सायकल मार्टफ दुकानात काही आरोपी घुसून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत येथे दुकान चालवू नये अशी धमकी दिली. त्यांना चापटांनी मारहाण करून दुकानातील साहित्य बाहेर फेकण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर भीतीपोटी साळवे काही दिवस गावात परतले नाहीत. दरम्यान, २० एप्रिल रोजी मारुती मंदिराजवळ आणखी एका व्यक्तीवरही जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात एकूण १३ जणांचा समावेश असून सर्व आरोपी हे तेलकुडगाव येथील रहिवासी आहेत. तक्रार उशिराने दाखल होण्यामागे भीतीचे कारण असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







