
नेवासा – काल वैशाख शुद्ध एकादशी निमित्त नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सायंकाळी सहा वाजता पवित्र पैस खांबाची महाआरती मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. या महाआरतीचा मान साखर कामगार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जगधने सर व त्यांच्या पत्नी यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी डॉ. जगधने यांच्या वतीने २० किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद उपस्थित भाविकांना वाटप करण्यात आला. महाआरतीनंतर मंदिराचे महंत देविदास बाबा म्हस्के, विश्वस्त मंडळ तसेच संपर्क अधिकारी आशिष कावरे यांच्या हस्ते डॉ. जगधने यांचा सत्कार करण्यात आला.

महंत देविदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली एकादशी निमित्त सुरू करण्यात आलेल्या महाआरती उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, माऊली भक्तांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
यावेळी बोलताना डॉ. जगधने यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “महाआरतीनंतर मला साक्षात माऊलींचे दर्शन झाल्याचा अनुभव आला. माऊलींनी मला वारकरी भक्तांसाठी माझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार करण्याचा संदेश दिल्याचे मला जाणवले. हा माझ्यासाठी अत्यंत भाग्याचा क्षण आहे.”

तसेच मंदिर समितीच्या वतीने माऊलींच्या व गुरुवर्य बनशी महाराज तांबे यांच्या आशीर्वादाने आणि मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या प्राथमिक उपचार केंद्रासाठी आपण पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला औटी साहेब, शिवाजी होन, बनकर साहेब, अनंत नळकांडे, डॉ. शंकर शिंदे, डॉ. भाऊसाहेब घुले, डॉ. सांगळे मॅडम, डॉ. देशमुख, डॉ. नांदे, डॉ. निलेश लोखंडे, डॉ. थोरात, डॉ. योगेश परदेशी, डॉ. गणेश गरुटे, सतीश पिंपळे, निलेश जोशी, महेश मापारी, संजय सुकलकर, कारले सर, अनिल शिंदे, रवी जमधडे, विष्णू जाधव तसेच माऊली भक्त व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







