आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गोमांस

नेवासा- आज दिनांक. 28/04/2026 रोजी पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री सागर ढिकले पोलीस निरीक्षक यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे नेवासा खुर्द ता. नेवासा येथील नाईकवाडी कुरेशी मोहल्यात गोमांस विक्री होत आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने प्रभारी अधिकारी नेवासा यांनी तात्काळ पोलीस स्टाफ यांना सदर माहितीचा थोडक्यात आशय सांगून रवाना केले असता सदर पोलीस स्टाफ व पंच असे नाईकवाडी कुरेशी मोहल्ला, नेवासा खुर्द या ठिकाणी गेले असता तेथे अरबाज अबू चौधरी हा इसम गोमांस तोडून विक्री करत असल्याचे खात्री होताच

गोमांस

सकाळी 08.30 वाजता छापा टाकून त्यास जागीच पकडून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अरबाज अबू चौधरी वय 29 वर्षे राहणार नाईकवाडी मोहल्ला नेवासा खुर्द असे सांगून तो बसलेल्या ठिकाणची पंचासंमक्ष झडती घेतली असता तेथे गोमांस मिळून आले ते पंचासमक्ष जप्त करीत असताना पुन्हा माहिती मिळाली की शेजारी राहत असलेला आयाज शेख याचे राहते घरात वरच्या मजल्यावर देखील गोमांस विक्री चालू आहे अशी माहिती मिळाली त्या ठिकाणी सुद्धा पोलीस पथक पाठून खात्री केली असता तेथे आवेज आयाज शेख हा गोमांस विक्री करताना मिळून त्यास जागीच पकडून सदर ठिकाणी सुद्धा जप्ती पंचनामा करून एकूण 155 किलो अंदाजे 46500 रुपये किमतीचे

गोमांस

तसेच एक इलेक्ट्रिक वजन काटा 1000 रुपये किमतीचा, 500 रुपये किमतीचा वजन काटा व सत्तुर जुना वापरता असा एकूण 48,000/रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे नेवासा येथे प्रचलित कायद्यान्वये श्रीनाथ नवनाथ गवळी पोलीस कॉन्स्टेबल 895 नेवासा पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरचे कामगिरी श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री सोमनाथ वाकचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग, श्री नीरज राजगुरू, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शना खाली पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री.सागर सोमनाथ ढिकले, पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, नारायण डमाळे, राम वैद्य, गणेश जाधव, सुमित करंजकर यांनी केली आहे…

गोमांस
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोमांस
गोमांस
गोमांस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोमांस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!