आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
यशवंत स्टडी क्लब
यशवंत स्टडी क्लब

नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत स्टडी क्लब, नेवासा येथील विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचा मान उंचावला आहे. विद्यार्थी चिंधे प्रद्युमन (PSI – पोलीस उपनिरीक्षक), वाघमारे दिग्विजय, वाखूरे विजय, भांड सुदर्शन, तागड मयूर यांची पोलीस पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा स्टडी क्लबमध्ये विशेष सत्कार करण्यात आला.

यशवंत स्टडी क्लब

या कार्यक्रमाचे औचित्य साधून उद्योजक मा. श्री. शिवाभाऊ पाठक यांच्या वाढदिवसानिमित्त “सृजन कट्टा” या उपक्रमासाठी ₹11,000 किमतीची पुस्तके अभिजित अष्टेकर यांनी भेट दिली.

कार्यक्रमाला श्री नंदकुमार पाटील, डॉ. शंकर शिंदे, श्री. बाळासाहेब पवार, श्री महेशभाऊ मापारी, श्री. भैय्या कावरे, प्रा. देविदास साळुंके, अ‍ॅड. गोरे भाऊसाहेब, श्री. राहुल सानप, श्री. जयदीप जामदार, श्री. सौरभ मुनोत, श्री बाळासाहेब नगरे तसेच स्टडी क्लबचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यशवंत स्टडी क्लब

यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांनीही आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल अनुभव सांगत इतरांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली निंबाळकर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. देविदास साळुंके यांनी मानले.

यशवंत स्टडी क्लब

ग्रामीण भागात जन्म घेऊनही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासातून इतर विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यशवंत स्टडी क्लब

यशवंत स्टडी क्लब, नेवासा येथील आतापर्यंत तब्बल 60 विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रुजू झाले असून ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
– महेश मापारी (समन्वयक, यशवंत स्टडी क्लब, नेवासा)

यशवंत स्टडी क्लब

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

यशवंत स्टडी क्लब
यशवंत स्टडी क्लब
यशवंत स्टडी क्लब

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

यशवंत स्टडी क्लब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!