आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन

नेवासा – नगरपंचायत नेवासा या ठिकाणी 67 वा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जपणे, व ज्या ज्या महानुभावांनी महाराष्ट्रासाठी योगदान ते एस एम जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद डांगे, केशवराव जेधे, माधवराव बागल, भाई, उद्धवराव पाटील, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील आदींचे तसेच संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची अहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांचे स्मरण करून गौरवशाली महाराष्ट्र घडवला अशा मान्यवरांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करून ध्वज वंदन केले.

महाराष्ट्र दिन

ध्वजवंदना पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते व कामगारांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर जागतिक कामगार दिन आहे आपल्या नेवासा शहरातील असे काही कारागीर व कामगार आहेत ज्यांनी आपलं अख्ख आयुष्य वेचलं, प्रामाणिकपणे काम केलं, नेवासा शहराची भरभराट होण्यासाठी योगदान दिले.

महाराष्ट्र दिन

दगड घडाई कामगार, पाथरवट, टापकर, गटई कामगार, टेलरिंग कामगार, रिक्षा ड्रायव्हर, कापड दुकान, किराणा दुकान, मेडिकल स्टोअर, हलवाई या ठिकाणी असलेले कामगार, हॉस्पिटलमध्ये असलेले कामगार, स्वच्छता कामगार, पाणीपुरवठा कामगार, पेपर विक्रेते कामगार, मेकॅनिक कामगार, नाभिक कामगार अशा काही निवडक मान्यवर कामगारांचा त्यांच्या जीवना प्रती व कामाप्रती आदरभाव व्यक्त करत नगरपंचायत नेवासा यांच्या वतीने 67 सामान्य पण आदर्श कामगारांचा कृतज्ञतापूर्वक त्यांचा सन्मान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र दिन

यावेळी कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे साहेब, उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान सभापती जयश्री शिंदे गटनेते महेश लोखंडे जितेंद्र कुऱ्हे नगरसेवक अंकुश म्हस्के, प्रवीण आप्पा सरोदे, जालिंदर गवळी, दिनेश व्यवहारे कृष्णा परदेशी यांच्या सह कामगार नेते अनिल सोनवणे, बजरंग शेठ इरले, लक्ष्मण चांदणे, अशोक डौले, अशोक चौधरी, राजकुमार शेंडे, राजू परदेशी, विजय कापसे या कामगारांसह अनेक कामगार आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन विश्वास वाघमारे, सागर पवार, गौरव जाधव, अनिकेत ढोकणे, उदय सुसे यांनी परिश्रम घेतले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराष्ट्र दिन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!