आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
महाराष्ट्र दिन

मक्तापूर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळवे वस्ती, मक्तापूर येथे १ मे ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’ आणि विविध स्पर्धांचा ‘बक्षीस वितरण समारंभ’ आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘गणित ऑलिम्पियाड’ आणि इतर शालेय स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र दिन

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापीका शिक्षिका सौ. मेरगु मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले श्री. गणेश झगरे महाराष्ट्र राज्य सुकाणू समिती अध्यक्ष,
गोरक्षनाथ नवघरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच गावातील मान्यवर श्री. बाळासाहेब शिरसाट, श्री. दिवाकर साळवे, श्री. सचिन गायकवाड, श्री. सुरेश बर्डे, श्री. शालूमन साळवे आणि श्री. दानियल हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

महाराष्ट्र दिन

‘शाळापूर्व तयारी मेळावा’ आणि ‘प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या या उपक्रमाचे व शाळेतील शिक्षिका सौ. मेरगु मॅडम व शिक्षक श्री रवी महागावे सर यांचे मक्तापूर परिसरातील पालकांनी आणि ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे.

newasa news online
महाराष्ट्र दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराष्ट्र दिन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!