आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
दहावी
दहावी

नेवासा : नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे मराठा सुकाणू समिती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थिनींचा जंगी सत्कार व स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.

दहावी

यावेळी पल्लवी ज्ञानेश्वर नवघरे हिने ७७ टक्के गुण मिळवून यश संपादन केले असून प्रीती शिवाजी उबाळे हिचाही विशेष सत्कार करण्यात आला.

दहावी

कार्यक्रमात बोलताना मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, ग्रामीण भागातील मुली आज शिक्षणाच्या बळावर मोठी झेप घेत आहेत.

दहावी

गावातील हीच मुले आणि मुली उद्या देशाचे कलेक्टर, इंजिनिअर, पोलीस अधिकारी यांसारख्या मोठ्या पदांवर पोहोचू शकतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी आहे.

मक्तापूर गावाची मान उंचावणाऱ्या विद्यार्थिनींचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बाळासाहेब देवराव बर्डे, माजी सरपंच हरिभाऊ कोळेकर, ज्ञानेश्वर नवघरे, शिवाजी उबाळे, रामदास कांगणे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगणे, दीपक बर्डे, दीपक शिंदे, आजीनाथ झगरे, अमोल भागवत, सचिन गायकवाड, गोरक्षनाथ नवघरे, अविनाश बर्डे, रमेश साळवे, प्रगतशील शेतकरी तुकाराम बर्डे, मनोज झगरे, भाऊसाहेब साळवे, पेत्रस साळवे, अविनाश हिवाळे, जोईल साळवे, अमोल सातपुते, प्रदीप साळवे, राहुल जामदार, अंशा बापू नवरे, बादशाहभाई शेख, दादासाहेब नवघरे, लक्ष्मण तुकाराम बर्डे, कचरू जामदार यांच्यासह मक्तापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दहावी
दहावी
दहावी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दहावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!