आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
भाऊराव पाटील

शंतनू सूर्यकर, नेवासा..

भाऊराव पाटील

महापुरुषांच्या विचाराची नाळ एकमेकांशी सतत जोडलेली असते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म हा महात्मा फुले यांचे निधन व्हायच्या अगोदर फक्त तीन वर्षे अगोदर झाला होता.
त्यांचा म. फुले यांच्याशी व्यक्तिशः काही संबंध आला नव्हता..


परंतु कर्मवीर भाऊराव हे म. फुले यांच्या विचारांचे अनुयायी होते. म. फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या सर्व सभांना ते आवडीने हजर राहात.

सातारा कराड भागात दोन मंदिरामध्ये जातीभेद करून जेवण वाढले जात असे. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या मंदिरात हजेरी लावली, आंदोलन केले.तेव्हा ” सत्यशोधक आले, सत्यशोधक आले “. असा एकच गलका झाला. पुढील वर्षापासून ही प्रथा बंद झाली.
कराड येथील सत्यशोधक समाजाच्या बैठकीमध्ये बहुजन समाजासाठी शिक्षण प्रसार व्हावा, म्हणून शिक्षण संस्था असावी असे अनेक जणांना वाटले.

भाऊराव पाटील

तेव्हा कर्मवीर यांनी शिक्षण संस्थेचे नाव ‘रयत’ असे ठेवावे असे सुचविले.
कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला ममतेने ‘ रयत’ म्हणत.

एकदा महात्मा गांधी हे सातारा कराड परिसरामध्ये कार्यक्रमाला येणार होते.
तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आमच्या संस्थेला आपण भेट द्यावी असे विनंती पत्र पाठवले होते.
महात्मा गांधी ने त्याला होकार दिला होता.
परंतु कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अनेक विरोधक होते. ऐनवेळेस कर्मवीरांना तार आली,की म. गांधीजी हे दौऱ्यामध्ये व्यस्त आहे, तर ते येऊ शकत नाही.
असे काही होणार याची कर्मवीर भाऊराव पाटील यांना जाणीव होतीच.

भाऊराव पाटील


जेव्हा म. गांधीजी सातारा परिसरामध्ये आले, तेव्हा आपल्या बोर्डिंग मधील सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी महात्मा गांधीजीची गाडी अडवली.
बाहेर काय गलका आहे, हे म. गांधीजींनी पाहिले आणि कर्मवीरांची त्यांच्या बोर्डिंगला भेट देण्याची विनंती मान्य केली आणि महात्मा गांधीजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण संस्थेत जवळजवळ 70 मिनिटे रमले.

कर्मवीर हे काँग्रेसचे नेते नव्हते,तरीसुद्धा त्यांनी वेळ दिला.
तेव्हा भिंगारदिवे नावाच्या दलित समाजातील मुलाने गांधीजींचा सत्कार केला. तेव्हा भाऊराव पाटील यांनी हा संस्कृत विषयांमध्ये पहिला आल्याचे सांगितले.
तेव्हा म. गांधीजींनी झटकन आपल्या गळ्यातला हार काढून भिंगारदिवे यास गळ्यात घातला. वस्तीगृहामध्ये सर्व जाती धर्माचे मुले कशी एकत्र राहतात. हे कर्मवीरांनी भाषणामध्ये नमूद केले व गांधीजींनी ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस ‘असे नाव असलेल्या फलकाचे अनावरण केले.

भाऊराव पाटील


बोर्डिंगचा निरोप घेताना गांधीजी म्हणाले, ” मला साबरमती आश्रमात जे शक्य झाले नाही, ते आपण येथे करून दाखवले आहे ” अशा रीतीने हा संस्थेचा इतिहासातला समारंभ मोठया आनंदात पार पडला.
तर या एकाच लेखांमध्ये म. गांधीजी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील हे एकाच विचाराने बांधल्याचे दिसून येत आहे.

आपलाच
श्री शंतनू सूर्यकर,नेवासा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाऊराव पाटील
भाऊराव पाटील
भाऊराव पाटील

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाऊराव पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!