आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पाऊस
पाऊस

नेवासा – भारतीय हवामान शास्त्र विभागणी पाऊस अंदाज 2026 साठी जाहीर केला आहे तो अत्यंत ढोबळ वाटतो सर्व भारतात 92% पाऊस होईल असे विधान केले आहे या विधानात तंतोतंतपणा बिलकुल नाही राज्याचा विचार करून यापुढील काळात प्रत्येक जिल्ह्याचा व तालुक्याचा पाऊस मान अंदाज स्थानिक पातळीवर प्रदर्शित करणे आवश्यक आहे मागील वर्षी अवकाळी चा फटका बसला तसाच फटका याही वर्षी बसला असला तरी पावसाचे प्रमाण कमी आहे. भारतीय हवामान शास्त्र या विभागातील संशोधन खूपच तुटपुंजे वाटते विज्ञान प्रगती झपाट्याने होत असताना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापर जगभर होत आहे.

पाऊस

व त्यामुळे तंतोतंत स्थानिक पातळीवर वर्तविलेले अंदाज मार्गदर्शक व सुचक ठरत आहेत मात्र दुर्दैवाने भारतीय हवामान शास्त्र विभागाचा पाऊस अंदाज वर्तवली अत्यंत अजब व आश्चर्यजनक आहे. चालू वर्षी 2026 मध्ये एल निनो चा परिणाम दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृत्रिम पावसाचे प्रयोग करणे व त्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे कृषी खात्याचा अभ्यास शंभर वर्षाचा पावसाचा डाटा अभ्यास करता असे आढळतेची दर दहा वर्षांनी मोठा दुष्काळ व दर तीन वर्षांनी छोटा दुष्काळ महाराष्ट्रात येतो हे चक्र कसे फिरते याचाही विचार करणे आवश्यक आहे.

पाऊस

महाराष्ट्रातील पाऊस माना संदर्भातील अंदाज हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे व पंजाबराव डख देतात त्यांच्या अंदाजामध्ये अनेक प्रकारचे समाधान मिळते तथापि त्यांना शासनामार्फत उत्तम प्रयोगशाळा व त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम मदतीला देणे आवश्यक आहे. भूगोलशास्त्राची अभ्यासक प्राध्यापक बी एन शिंदे यांचे सुद्धा अंदाज चांगल्या प्रकारे उपयोगी ठरत होते तथापि त्यांना काहीही मदत न मिळाल्यामुळे त्यांनी अंदाज देणे कमी केले आहे.

पाऊस

त्यांच्यातील गुणग्राहकता ओळखून त्यांचा उपयोग करून घेणे आवश्यक वाटते भारतीय पातळीवरील हवामान शास्त्र विभागात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची संख्या मोठी असली तरी त्यांनी आता संशोधनाची दिशा कामकाजाची पद्धत व अंदाज देण्याची ढोबळ व मोघम सिस्टीम बंद करावी व त्यामध्ये स्पेसिफिक व तंतोतंतपणा तयार करणे आवश्यक आहे आज मात्र भारतीय हवामान शास्त्र विभागाची पाऊस अंदाज देण्याची पद्धत अजब व आश्चर्यजनक व अत्यंत ढोबळ आहे असे प्रतिपादन डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाऊस
पाऊस
पाऊस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!