आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शेतकरी

सोनई – नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा पब्लिक स्कूल परिसरात शुक्रवारी (दि.२९ मे) सकाळी ९.३० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री शंकरराव गडाख उपस्थित राहणार आहेत. तसेच या शेतकरी मेळाव्यासाठी परिसरातील शेतकरी, नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी


माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी मृद व जलसंधारण क्षेत्रात काम करताना विविध विकासकामांवर भर दिला असून, ग्रामीण भागातील शेती आणि पाणी व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या कार्यक्रमामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजन समिती आणि कार्यकर्त्यांकडून तयारीला वेग देण्यात आला असून, कार्यक्रमस्थळी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरी या मेळाव्यासाठी परिसरातील शेतकरी, युवक, महिला तसेच नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकरी
शेतकरी
शेतकरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेतकरी
शेतकरी
शेतकरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!