
नेवासा – एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता पवित्र पैस खांबाची भव्य महाआरती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या महाआरतीस नेवासा पोलीस स्टेशनचे प्रमुख सागर ढिकले यांच्यासह पोलीस सहकारी अजय साठे, दादा बाबासाहेब वाघमोडे, संजय माने आणि संदीप बर्डे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी अण्णासाहेब जाधव टेलर यांच्या वतीने सुमारे ३० किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद उपस्थित भाविकांना वाटप करण्यात आला. तसेच मंदिराचे महंत देवीदास बाबा म्हस्के, विश्वस्त मंडळ आणि मंदिराचे संपर्क अधिकारी आशिष कावरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.

मंदिरात महंत देवीदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या एकादशी महाआरती उपक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, माऊली भक्तांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक केले जात आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आज मंदिरात महाआरती केल्यानंतर मला साक्षात माऊलींचे दर्शन झाल्याचा अनुभव आला. माऊलींनी मला पुढील सेवेत कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा संदेश दिला.”

तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “माऊलींच्या तसेच वै. गुरुवर्य बनशी महाराज तांबे यांच्या आशीर्वादाने मी माझ्या प्रशासकीय सेवेत सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य आणि मदत करण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत राहीन,” असा शब्द त्यांनी माऊलींच्या चरणी दिला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







