आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

घोडेगाव – १५ जून रोजी शालेय वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतोबावाडी येथे नवागतांचे स्वागत थाटामाटात करण्यात आले. या वेळी विद्यार्थी, पालक व शिक्षकांची प्रभात फेरीही काढण्यात आली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष निमसे यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली तसेच शाळेचा पट वाढवण्यासाठी सर्वांनी मिळुन‌ प्रयत्न करावे असे सांगितले.

जिल्हा परिषद

तसेच इयत्ता पहिली मधे दाखल झालेल्या मुलांच्या प्रथम प्रवेशाबद्दल त्यांचे औक्षण करून त्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. तसेच त्यांना गुलाबपुष्प आणी चॉकलेटही भेट देण्यात आले. आज शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकाचे वाटप शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेतर्फे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी परिसरातील सर्व पालक आणि मान्यवरही उपस्थित होते.

जिल्हा परिषद

कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गणेश लांडे ,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष निलेश पटारे,श्री गणेश तांदळे यांनी मनोगत व्यक्त केले, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गणेश लांडे,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष निलेश पटारे व पालक मोठया संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे व मान्यवरांचे आभार श्रीमती सविता दरंदले यांनी मानले.

जिल्हा परिषद

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जिल्हा परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!