आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
खत
खत

घोडेगाव –पांढरीपुल येथील शिंगवे तुकाई हद्दीतील एमआयडीसी येथे एका खत कंपनीवर कृषी विभागाने कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने बनावट पद्धतीने रासायनिक खतांचे पॅकिंग व साठवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत २,०३४ गोण्या रासायनिक खतांचा सुमारे २१ लाख ८० हजार ४८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कंपनीचे मालक किरण चंद्रकांत दौंडकर (रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खत


कृषी अधिकारी वाल्मिक एकनाथ सुडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. १५ जून रोजी रात्री ९ ते १६ जून रोजी पहाटे २.३० वाजेपर्यंत शिंगवे तुकाई येथील कृषी गौरव फर्टिलायझर्स प्रा. लि. येथे करण्यात आली.
तपासणीदरम्यान संबंधित कंपनीकडे स्वतःच्या नावाने खत उत्पादन व विक्रीचा परवाना असतानाही इतर विविध कंपन्यांच्या नावाने खतांचे उत्पादन, पॅकिंग व अनधिकृत साठवणूक केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. कृषी विभागाने पंचांसमक्ष खतांचे नमुने घेऊन काही खतांच्या गोण्या जागेवरच सीलबंद केल्या, तर उर्वरित साठा जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या खतांमध्ये विविध कंपन्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या एकूण २,०३४ गोण्या असून त्यांची अंदाजे किंमत ₹२१,८०,४८६ इतकी आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट खत व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खत


या प्रकरणी बी.एन.एस. कलम ३१८(४) तसेच रासायनिक खत (नियंत्रण) आदेश १९८५ मधील संबंधित तरतुदी आणि आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कृषी विभागाच्या पथकाने सोनई पोलिसांच्या मदतीने केली. पुढील तपास पोलीस सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करीत आहेत.
या कारवाईमुळे बनावट किंवा अनधिकृत खत उत्पादन व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.​

खत


​सदर यशस्वी कामगिरी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे प्र.कृषी विकास अधिकारी विकास काळे, निलेश अभंग, कृषी अधिकारी (पं.स. नेवासा) वाल्मीक सुडके, तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेवासाचे कृषी अधिकारी सुहास धस, पंचायत समिती पारनेरचे कृषी अधिकारी राहुल कदम यांच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी पार पाडली.
​या धडक मोहिमेसाठी कृषी विभागाचे माननीय संचालक (गुण नियंत्रण) सुनील बोरकर साहेब, माननीय कृषी सहसंचालक बाळासाहेब जेजुरकर , मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक देशमुख , अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे , सुधीर शिंदे कृषि विकास अधिकारी अहिल्यानगर यांचे मार्गदर्शन लाभले.

खत
खत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खत
खत
खत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!