आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वेश्याव्यवसाय

आपला जिल्हा-याबाबत अधिक माहिती अशी की,श्री. मुम्मका सुदर्शन,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. संतोष मुटकुळे,स्थानिक गुन्हे शाखा, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहे.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे सपोनि/ हरिष भोये, पोलीस अंमलदार अतुल लोटके,विष्णु भागवत, गणेश लोंढे,बिरप्पा करमल,बाळासाहेब नागरगोजे, प्रकाश मांडगे, महिला पोलीस अंमलदार काळे यांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.

वेश्याव्यवसाय


पथक दिनांक 19/06/2026 रोजी सुपा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत हॉटेल ओम साई व राखी पॅलेस लॉजिग पळवे शिवार,ता. पारनेर या ठिकाणी हॉटेल मालक हे महिलाकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवित आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथक व सुपा पोलीस स्टेशन अशांचे संयुक्त पथक तयार करून छापा कारवाई करणेबाबत रवाना झाले.
पथकाने हॉटेल ओम साई, येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता एक बनावट ग्राहक म्हणुन पाठविले.

वेश्याव्यवसाय

तपास पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर सदर हॉटेलवर छापा टाकुन हॉटेलमधील इसम नामे 1) सुनिल लक्ष्मण खोले,वय-39 वर्षे रा. नारायणगव्हाण ता. पारनेर, 2) विनोद विलास मिडाळेकर,वय-29 वर्षे रा. शास्त्रीनगर, ता.जि. बेळगाव, हल्ली रा. ओम साई हॉटेल पळवे ता. पारनेर यांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन 25,000/- रूपये किंमतीचा दोन मोबाईल व 1,000/- रूपये रोख रक्कम असा एकुण 26,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेलची पाहणी करता हॉटेलचे रूममध्ये 2 महिला मिळून आल्या.तसेच ताब्यातील इसम व महिला यांना सदरचे काम कोणासाठी करता याबाबत विचारपुस करता त्याने सदरचे काम 3) संग्राम कांडेकर रा. नारायणगव्हाण ता. पारनेर(फरार) यांचेसाठी करत असल्याचे सांगितले आहे.

वेश्याव्यवसाय

त्यानंतर वरील पथकाने राखी पॅलेस लॉजिय येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता एक बनावट ग्राहक म्हणुन पाठविले. तपास पथकाने नमूद हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर सदर हॉटेलवर छापा टाकुन हॉटेलमधील इसम नामे 4) दिपक सुनार सन ऑफ रामबहादुर सुनार, रा.सुक्कड ता.सुक्कड कैलाली देश नेपाळ, हल्ली रा.राखी पँलेस लाँजिग पळवे ता. पारनेर, 5) गोवर्धन ओमप्रकाश बुल,रा. हसुलीया 1 बिसमपुर जि. कैलारी देश नेपाळ यांना ताब्यात घेवुन त्यांची घडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन 10,000/- रूपये किंमतीचा 01 मोबाईल व 1,000/- रूपये रोख रक्कम असा एकुण 11,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

वेश्याव्यवसाय

हॉटेलची पाहणी करता हॉटेलचे रूममध्ये 3 महिला मिळून आल्या. तसेच ताब्यातील इसम व महिला यांना सदरचे काम कोणासाठी करता याबाबत विचारपुस करता त्याने सदरचे काम 6) वैभव साठे रा. चास ता.जि. अहिल्यानगर (फरार) यांचेसाठी करत असल्याचे सांगितले आहे.नमूद महिलाकडे विचारपुस करता त्यांनी आम्हास वेश्या व्यवसायाकरीता आणल्याचे सांगुन, ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधुन आम्हास पैस देतात व आमचेकडून वेश्याव्यवसाय करून घेतात.वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते अशी माहिती सांगीतली.
वरील आरोपीविरूध्द पोहेकॉ/1733 अतुल भानुदास लोटके,नेम.स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशन गुरनं 207/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 99, सह स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन करीत आहेत.

वेश्याव्यवसाय
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वेश्याव्यवसाय
वेश्याव्यवसाय
वेश्याव्यवसाय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वेश्याव्यवसाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!