
नेवासा – पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत एका इसमाकडून तलवार जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेवासा पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पिचडगाव येथील शुभम ज्ञानदेव चौघुले, वय २७ वर्षे, याच्या राहत्या घरी छापा टाकला. या कारवाईत सुमारे २७ इंच लांबीची व ७ इंच गोलाकार पितळी मुठ असलेली स्टीलची तलवार जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या तलवारीची अंदाजे किंमत तीन हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सुदामदेव रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू आणि वैभव कुलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपपोलीस निरीक्षक विकास पाटील, पोहेकॉं एस. डी. राठोड, पोहेकॉं बी. बी. काळोखे, पोलीस कॉन्स्टेबल डी. एस. रसाळ, एस. व्ही. राठोड आणि ए. एस. शेख यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉं बी. बी. काळोखे हे करत आहेत.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात नेवासा पोलिसांनी सुरू केलेल्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची भूमिका अधिक ठळकपणे समोर येत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







