
आपला जिल्हा – गिरिम, ता. दौंड जि. पुणे येथील मुळ रहिवासी असलेले व सध्या अहिल्यानगर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना राज्य सरकारने पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती दिली आहे.
आज राज्य सरकारने राज्यातील 224 पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक ते पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती दिली आहे.

सेवा कालावधी व सेवा अभिलेख पडताळणी आणी छाननी करून पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्य शासनाकडे अहवाल पाठवला होता. कर्मठ शिस्तीचे म्हणुन परिचित असलेले वरीष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचा देखील या आदेशात समावेश आहे. राज्य शासनाने पदोन्नतीने त्यांची धानोरा, जि. गडचिरोली या नव्या ठिकाणी नेमणूक केली आहे.

धनंजय जाधव हे सन 1993 साली सरळ सेवा भरतीने पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यामध्ये आले होते. त्यांची एकूण 32 वर्ष सेवा झाली असुन त्यांना सेवा कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करिता जवळपास 200 पेक्षा जास्त बक्षिसे मिळाली आहेत. जाधव यांना शासनाने ऑगस्ट 2023 देखील पदोन्नती देऊ केली होती परंतु वैयक्तिक कारणास्तव त्यांनी ती नाकारली होती.

धनंजय जाधव यांनी 1994 साली प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, पुणे शहर, सोलापूर ग्रामीण, कोल्हापूर व अहिल्यानगर या ठिकाणी सक्षमपणे कर्तव्य पार पाडले आहे. धनंजय जाधव ऑगस्ट 2029 अखेर सेवा निवृत्त होणार आहेत.

पदोन्नती मिळाल्याने जाधव यांनी आनंद व्यक्त केला असून जनतेची आणखी चांगली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली असल्याने शासनाचे आभार मानले आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







