राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार (दि. २८ जून २०२६) रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शिरसगाव ग्रामपंचायतीच्या नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते पाच वर्षाच्या आतील लहान बाळाला आमदार लंघे यांच्या हस्ते पोलिओची लस देण्यात आली.
या वेळी नागरिकांनी आपल्या लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजून मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहायला मिळाला.

शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत सर्व बूथवर लसीकरण करण्यात येत असून, लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नवजात बालकांनाही ही लस देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना आरोग्य निरीक्षक धर्मनाथ पालवे हे बोलताना म्हणाले की “पोलिओ हा अत्यंत गंभीर आजार असला तरी वेळेवर लसीकरण केल्यास तो पूर्णपणे टाळता येतो. प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. भारताने पोलिओमुक्त देशाचा मान मिळविला असला तरी जगातील काही भागांत अजूनही पोलिओची प्रकरणे आढळतात. त्यामुळे सतर्कता कायम ठेवणे आणि प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

आ.लंघे म्हणाले की, पोलिओ हा विषाणूजन्य संसर्ग असून तो प्रामुख्याने पाच वर्षांखालील बालकांना बाधित करतो. या आजारामुळे कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते. मात्र, प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत नियमितपणे पोलिओचे दोन थेंब दिल्यास या आजारापासून प्रभावी संरक्षण मिळते. त्यामुळे कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू देऊ नये. सर्व पालकांनी आपले पाच व पाच व वर्षा आतील बालकांना पोलिओ डोस पाजून घ्यावा असे आवाहन आमदार लंघे यांनी केले.
यावेळी पत्रकार मंगेश निकम यांनी शासनाच्या या जनहिताच्या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, “भविष्यात देशात पुन्हा पोलिओचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शासन सातत्याने ही मोहीम प्रभावीपणे राबवत आहे. जनजागृती करून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लस पोहोचविण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी भागवत दहिफळे,आरोग्य अधिकारी शिरसगाव हर्षदा देवरे,श्री नवनाथ साळुंखे,श्री हर्षद देशमुख, श्री सोमनाथ आसने आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी अशा सेविका अंगणवाडी सेविका आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







