आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जलजीवन मिशन

काँग्रेसचे संभाजी माळवदे यांच्या पाठपुराव्यास मोठे यश

नेवासा – मजीप्रातील भ्रष्टाचारवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेत चार अभियंत्यांना घरचा रस्ता दाखवत मोठी कारवाई केली. काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी तब्बल तीन वर्ष या घोटाळ्याचा पाठपुरावा करत याविरोधात अनेकदा आंदोलने केली. नेवासा कार्यलयासमोर, अहिल्यानगर कार्यलयासमोर आंदोलने केली.राज्य सरकारकडे याबाबत चौकशीसाठी तक्रारी केल्या. व शेवटी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली. या सर्व पाठपुराव्यामुळे कारवाई करण्यात आली. मजीप्रामधील भ्रष्टाचार माळवदे यांनी उघडकीस आणला. याबाबत पावसाळी अधिवेशनात नेवासा विधानसभेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना प्रश्न देखील उपस्थित करण्यासाठी माळवदे यांनी निवेदन दिले होते. शेवटी सरकारने चार अभियंत्याना निलंबित करत मोठी कारवाई केली.

जलजीवन मिशन


निलंबित केलेले अधिकारी –
१)एस.एस. दहिफळे ( उपअभियंता नेवासा )
२) एम.पी.धगधगे (तत्कालीन उपाभियंता नेवासा )
३). जी. एस.भोगावडे (कार्यकारी अभियंता, अहिल्यानगर )
४). एस. आर.वारे ( तत्कालीन कार्यकारी,अभियंता अहिल्यानगर )

जलजीवन मिशन


” लवकरच आझाद मैदानात आंदोलन”
या भ्रष्टाचाराची व्याप्ती अहिल्यानगर जिल्ह्यापूर्ती मर्यादित नसून पूर्ण राज्यभर आहे. हजारो कोटींचा घोटाळा असून पूर्ण राज्यातील घोटाळे बहाद्दरावर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. याविरोधात लवकरच मुंबई येथे आझाद मैदानात आंदोलन करणार – संभाजी माळवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.

जलजीवन मिशन
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जलजीवन मिशन
जलजीवन मिशन
जलजीवन मिशन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जलजीवन मिशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!