आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आषाढी दिंडी

नेवासा : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पालखी दिंडी सोहळ्यात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने “अमली पदार्थ विरोधात जनजागृती मोहीम – २०२६” अंतर्गत व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश वारकरी, महिला आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

आषाढी दिंडी

ही संकल्पना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेसाठी प्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत आणि चित्रकार सत्यजित उदावंत यांनी अत्यंत बोलकी व आशयघन व्यंगचित्रे साकारली. व्यसनमुक्तीचा संदेश देणारे हे फलक दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांचे विशेष आकर्षण ठरले.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ फलक प्रदर्शन न करता समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते हे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांच्यासह आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आषाढी दिंडी

दिंडी मार्गावर हजारो महिला वारकरी व नागरिकांच्या हातात व्यसनमुक्तीचे संदेश असलेले फलक देण्यात आले. “रामकृष्ण म्हणा, नको आता तंबाखू-चुना” तसेच “ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा; व्यसनापुढे नका टेकवू माथा” अशा प्रभावी घोषणांनी संपूर्ण परिसर व्यसनमुक्तीच्या संदेशाने भारावून गेला.

उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत, “आध्यात्मिक वातावरणात पोलीस प्रशासनाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबविलेली ही व्यसनमुक्ती मोहीम अत्यंत स्तुत्य असून, यामुळे विशेषतः तरुण पिढीमध्ये व्यसनांविषयी जनजागृती होऊन सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होईल,” अशा भावना व्यक्त केल्या.

आषाढी दिंडी

नेवासा पोलीस ठाण्याच्या या अभिनव उपक्रमाचे तसेच चित्रकार भरतकुमार उदावंत आणि सत्यजित उदावंत यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून दिलेल्या प्रभावी सामाजिक संदेशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आषाढी दिंडी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आषाढी दिंडी
आषाढी दिंडी
आषाढी दिंडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आषाढी दिंडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!