खेडले परमानंद (ता. नेवासा): मुळा एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी संलग्न कृषि महाविद्यालय सोनई यांच्या ग्रामीण (कृषि) जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत “शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान प्रचार-प्रसार कार्यक्रम” (RAWE) कार्यक्रमा अंतर्गत खेडले परमानंद येथील घोरपडे वस्तीवर आयोजित करण्यात आला होता .
तद् प्रसंगी “क्षारयुक्त जमिनीचे व्यवस्थापन” या विषयावर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राला पंचक्रोशीतील शेतकरी, युवक व महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषीकन्यांनी उपस्थित मान्यवर व शेतकरी बांधवांचे स्वागत केले. प्रास्ताविकात चर्चासत्राची उद्दिष्टे स्पष्ट करून शेतकऱ्यांना आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी शेतकरी व गावातील युवकांनी क्षारयुक्त जमिनीमुळे होणाऱ्या समस्या, ऊस पिकातील घटते उत्पादन, माती परीक्षण, अन्नद्रव्यांची कमतरता, सिंचनाचे नियोजन, खतांचे संतुलित व्यवस्थापन तसेच आधुनिक शेतीतील विविध अडचणी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केले.

प्रा. जयसिंग वाघमारे (मृदा विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग) यांनी क्षारयुक्त जमिन होण्याची कारणे. माती परीक्षण, जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता तसेच क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणा उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर, पिकांचे अवशेष (पाचट) जमिनीत मिसळणे, जिप्समचा योग्य वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि योग्य निचरा व्यवस्था यांमुळे जमिनीची सुपीकता वाढविता येते, असे सांगितले.
यानंतर प्रा. राहुल गडाख (सहाय्यक प्राध्यापक, कृषिशास्त्र विभाग) यांनी ऊस पिकाचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन, माती परीक्षण अहवालानुसार खतांचा वापर, पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक कृषी तंत्रज्ञान तसेच शाश्वत शेतीसाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकरी व युवकांच्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य मा. प्रा. सुनिल बोरुडे यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी महत्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच मातीतील सेंद्रिय कर्ब, संतुलित अन्नद्रव्ये, योग्य सामू (pH), सूक्ष्मजीवांची सक्रियता, दर्जेदार सिंचनाचे पाणी आणि योग्य पीक व्यवस्थापन हे जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणारे प्रमुख घटक असल्याचे त्यांनी सांगितले. शाश्वत शेतीसाठी मातीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रगतशील सेंद्रिय शेतकरी सेंद्रिय शेतीचे अभ्यासक सूर्यभान आघाव यांनी आपल्या सेंद्रिय शेतीच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन करत ऊस पिकातील सेंद्रिय व्यवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याच्या पद्धती, सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड पारंपरिक अनुभवाशी देण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. हरी मोरे, कार्यक्रम समन्वयक प्रा. अनुप दरंदले प्रा. दिशा चव्हाण, डॉ. संतोष चौगुले प्रा. नरेंद्र दहातोंडे.

मान्यवरांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाधारित कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी अशा बांधावरील चर्चासत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषीकन्या सिद्धी माळवदे, शिवानी चौधरी, भक्ती मांजरेकर, साक्षी कानगुडे, पल्लवी मंडलिक व साक्षी भोगल यांनी केले. उपस्थित शेतकरी व युवकांनी कृषीकन्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा शास्त्राधारित चर्चासत्रांमुळे शेतीतील समस्यांवर प्रभावी मार्गदर्शन मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

अशा प्रकारच्या शास्त्राधारित उपक्रमांमुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, गुणवत्तापूर्ण पीक व शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यास निश्चितच बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला सेंद्रिय शेतीचे अभ्यासक प्रगतशील शेतकरी सूर्यभान आघाव ,मुळा सहकारी साखर कारखान्याचे मा . चेरमन नानासाहेब तुवर , घोरपडे मामा, बाळसाहेब आंबिलवादे,पोपट नाना राजळे, राजु भाऊ आघाव , योगेश काका जाधव, नयुम भाई इनामदार, संतोष तुवर , प्रदिप तुवर आदिसह अनेक शेतकरी चर्चासत्रात सहभागी झाले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







