आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
उपजिल्हाधिकारी
उपजिल्हाधिकारी

आपला जिल्हा – ११ जुलै .अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हानिवडणूक अधिकारी श्री सुनील गाढे यांनी सुटीच्या दिवशी राहुरी तालुक्यातील कणगर या गावी अचानक सकाळीच भेट देऊन सध्या संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा अनुषंगाने सुरू असलेल्या कामाचा आढावा उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून घेतला.

उपजिल्हाधिकारी

यावेळी कणगर गावाचे सरपंच श्री सर्जेराव घाडगे यांचा फॉर्म भरला नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी स्वतःच्या उपस्थितीत समक्ष सरपंच यांचा फॉर्म भरून घेतला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी सदर मोहिमेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गणना पत्रक भरून न दिल्यास मतदार यादीत नाव येणार नसल्याचीही त्यांनी उपस्थिताना जाणीव करून दिली.

उपजिल्हाधिकारी

तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे ज्यावेळी घरी भेटी देतील त्यावेळी मतदार यांनी त्यांचे फॉर्म भरणेकामी स्वतःहून पुढे होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच कुटुंबातील काही सदस्य बाहेरगावी गेले असतील तर त्यांचे कुटुंब प्रमुखाने फॉर्म भरून द्यावा असे सांगितले.

उपजिल्हाधिकारी

अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांचे मार्गदर्शनाखाली मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात 90 टक्क्यांपेक्षा अधिक गणना पत्रक तथा EF फॉर्म चे वाटप झाले असून सदर फॉर्म चे 20 % डिजिटायझेशन चे देखील काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO यांनी या मोहिमेस सहकार्य केल्यामुळे चांगले काम अहिल्यानगर जिल्ह्यात झाले असून काही BLO यांनी 100 टक्के काम देखील पूर्ण केले असून त्यांच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे हस्ते गौरव देखील करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उपजिल्हाधिकारी

यावेळी कणगर ग्रामस्थांच्या वतीने सुनील गाढे यांचा सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोविंद दिवे, भाऊसाहेब नालकर, सरपंच सर्जेराव घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच बाळासाहेब गाढे, भास्कर वारघुडे, बाबुराव घाडगे यांचेसह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी चांगले काम करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्री भारत खाटेकर ग्रा पंचायत कर्मचारी व श्री उबाळे प्राथमिक शिक्षक यांचा सत्कार उपजिल्हाधिकारी यांनी केला.

उपजिल्हाधिकारी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपजिल्हाधिकारी
उपजिल्हाधिकारी
उपजिल्हाधिकारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपजिल्हाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!