
आपला जिल्हा – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी अत्यंत मजबूत आणि गतिमान करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना नेते संजय राऊत साहेब, संपर्क प्रमुख आमदार सुनिल शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख जगदीश चौधरी साहेब आणि जिल्हा प्रमुख सचिन कोते साहेब यांच्या विशेष पुढाकाराने व नियोजनाने या सर्व नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

या घोषणेमध्ये प्रामुख्याने श्रीरामपूर तालुका आणि परिसरातील विविध पदांवरील जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
पदाधिकारी यादी:
उपजिल्हाप्रमुख :
निखिल पवार(श्रीरामपूर)
सचिन लाटे (देवळाली 32 गावं)
तालुकाप्रमुख :
लखन भगत(श्रीरामपूर)
दत्तात्रय कडू (देवळाली 32 गावं)
उपजिल्हा संघटक :
प्रमोद टाकसाळ, रफिक शेख
तालुका संघटक:
किशोर ढोकचौळे, अण्णासाहेब कांबळे

तालुका समन्वयक : कैलास पुजारी
विधानसभा प्रमुख :
नितीन शिंदे, राजेंद्र थोरात
विधानसभा संघटक : दत्तात्रय पठारे
उपतालुकाप्रमुख :
प्रदीप मोहिते, अक्षय कोहकणे
उपसमन्वयक :
रमेश केसरकर

शहर पदाधिकारी व कार्यक्षेत्र:
शहरप्रमुख :
समीर शेख (श्रीरामपूर)
सुरेश थोरे (श्रीरामपूर)
विजय कुमावत (देवळाली)
मुश्ताक शेख (बेलापूर शहर)
शहर संघटक :
रमेश घुले (श्रीरामपूर)
शहर समन्वयक :
इरफान पठाण (श्रीरामपूर)
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटना बळकट करण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून, पक्षाच्या सर्व स्तरांतून आणि निष्ठावंत शिवसैनिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







