आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
स्वयंरोजगारा
स्वयंरोजगारा

नेवासा: नेवासा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व कष्टाळू तरुणांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वयंरोजगार उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत इच्छुक तरुणांना मालवाहतूक वाहन खरेदीसाठी ३५ टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

स्वयंरोजगारा

या योजनेमुळे ग्रामीण भागात मालवाहतूक व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार असून, शेतीमालाची वाहतूक, बाजारपेठेतील विविध व्यावसायिक कामे तसेच इतर मालवाहतुकीसाठी वाहनाचा उपयोग करता येणार आहे. यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

स्वयंरोजगारा

योजनेअंतर्गत वाहन खरेदीसाठी शासनाकडून ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार असून, उर्वरित रकमेसाठी बँक कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या व्यवसायातून नियमित उत्पन्नाचे साधन निर्माण होऊन तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

स्वयंरोजगारा

योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी खालील लिंकवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज लिंक:
https://forms.gle/UP9eBPnZrjNF8e3MA

स्वयंरोजगारा

अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 8329406448
📞 7507289289

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वतीने तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या स्वयंरोजगार उपक्रमाचा लाभ घेऊन आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टीप: योजनेतील अनुदान, कर्ज व पात्रतेसंदर्भातील अंतिम अटी व मंजुरी संबंधित शासकीय नियम व वित्तीय संस्थांच्या निकषांनुसार लागू राहतील.

स्वयंरोजगारा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्वयंरोजगारा
स्वयंरोजगारा
स्वयंरोजगारा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्वयंरोजगारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!