आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अण्णासाहेब पटारे

नेवासा | प्रल्हाद शिंदे : नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्री. अण्णासाहेब पटारे यांची पुन्हा एकदा (फेर निवड) करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अँड. गणेश पाटील यांनी पटारे यांच्या अधिकृत नियुक्तीची घोषणा केली.श्री. अण्णासाहेब पटारे हे नेवासा तालुक्यातील एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

अण्णासाहेब पटारे

ते सध्या नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी अनेक वर्षे तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक म्हणूनही यशस्वी काम पाहिले आहे. याशिवाय, सुरेगाव (गंगा) गावचे सरपंचपदही त्यांनी अनेक वर्षे भूषवले असून ग्रामीण भागातील विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू सहकारी आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे निकटवर्तीय म्हणून पटारे यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाला नवीन ऊर्जा मिळणार आहे.

अण्णासाहेब पटारे

आपल्या या फेर निवडीनंतर बोलताना अण्णासाहेब पटारे यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. आगामी काळात तालुक्यात काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यावर आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यावर आपला मुख्य भर असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पटारे यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे जोरदार स्वागत व अभिनंदन होत आहे.

अण्णासाहेब पटारे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अण्णासाहेब पटारे
अण्णासाहेब पटारे
अण्णासाहेब पटारे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अण्णासाहेब पटारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!