नेवासा-नेवासा मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, नेवासा फाटा येथे माननीय उदयनदादा गडाख पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या दिंडी सोहळ्याचा मार्ग नेवासा बसस्थानक ते श्री ज्ञानेश्वर मंदिर असा होता. बसस्थानक परिसरात आकर्षक रिंगण सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य, लाठी-काठी प्रात्यक्षिके, पताका, पालखी, तायक्वांदो प्रात्यक्षिके आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पाऊली आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.
दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘पाणी वाचवा’, ‘ग्रीन इंडिया’, पर्यावरण संवर्धन यांसह विविध सामाजिक संदेश देत समाजजागृती केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी भक्तीबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीचा संदेश दिला.

या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील नारायणलोखंडे कैलास कुंभकर्ण महेश मापारी नगरसेवक दिनेश व्यवहारे स्वप्निल मापारीअनिल शिंदे प्रशांत वाघ सुनील जाधव जयदीप जामदार
डॉ. खेडकर (एचआर प्रमुख), डॉ. घनवट (प्राचार्य, श्री ज्ञानेश्वर कॉलेज)यश अकॅडमीचे प्राचार्य शैलेश दरेकर , उपप्राचार्य असिफ शेख , कोरिओग्राफर भारत शिंदे , तसेच विविध मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिकांची प्रमुख उपस्थिती लाभली. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
या भव्य दिंडी सोहळ्याचे आदरणीय सुनीता ताई गडाख पाटील, माजी सभापती, पंचायत समिती, माननीय उदयनदादा गडाख पाटील (उपाध्यक्ष), डॉ. निवेदिता गडाख पाटील, श्री. उत्तमराव लोंढे (सचिव) आणि डॉ. विनायक देशमुख (सहसचिव) यांनी कौतुक व अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांचे आणि शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री. वैभव आढाव यांनी या दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी दाखविलेला उत्साह, शिस्त, सर्जनशीलता आणि शिक्षकांनी घेतलेले अथक परिश्रम यामुळे हा दिंडी सोहळा संस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.
भक्ती, संस्कृती, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा आषाढी एकादशी दिंडी सोहळा ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीतील एक अविस्मरणीय उपक्रम ठरला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







