घोडेगाव — नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील सराईत गुन्हेगारास गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की पोलीसांना विविध गुन्ह्यात हवा असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ चाट्या शेख यावर पंधरा पेक्षा अधिक गुन्ह्याची नोंद आहे.त्यास दोन वर्षांकरिता उपविभागीय दंडाधिकारी अहील्यानगर यांनी दिलेल्या आदेशानुसार सोनई पोलीसांनी त्यास दोन वर्षांकरिता अहील्यानगर जिल्ह्यातुन हद्दपार केले होते.

तसे असताना देखील हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून पुन्हा अहील्यानगर जिल्हा क्षेत्रात आला आहे. याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली असता त्यांनी त्यास मोरयाचिंचोरे येथुन ताब्यात घेत सोनई पोलीसांच्या ताब्यात दिले. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ३२८/२०२६ मह. पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक फौजदार काकासाहेब राख हे कगुन्हेगार सदरीची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस हवालदार विष्णु भागवत, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस काॅस्टेबल बाळासाहेब खेडकर, चालक पोलीस काॅस्टेबल प्रदीप शेळके यांच्या पथकाने केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







