आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गांजा

नेवासा (प्रतिनिधी):- नेवासा तालुक्यातील वाकडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्रीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या व विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन जणांना नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून ४ लाख ७८ हजार ६० रुपयांचा तब्बल ४७.८२८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

गांजा

मिळालेल्या माहितीनुसार २४ जुलैच्या रात्री ११:५० ते २५ जुलैच्या मध्यरात्री १:५० च्या सुमारास नेवासा पोलिसांना वाकडी शिवारात गुंगीकारक अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रताप दराडे यांना माहिती मिळताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या उपस्थितीत नेवासा पोलिसांनी तात्काळ वाकडी येथील महादेव पंडित जवदे याच्या राहत्या घराजवळील शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.

गांजा

पोलिसांनी शेडची पाहणी केली असता तेथे पिवळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या ३ वेगवेगळ्या गोण्यांमध्ये गांजाचा साठा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. पिवळ्या गोणीत १५.८४२ किलो (किंमत १,५८,४२० रु.), पांढऱ्या गोणीत १३.१०- किलो (किंमत १,३१,००० रु.) आणि हिरव्या गोणीत १८.८८६ किलो (किंमत १,८८,६४० रु.) असा एकूण ४७.८२८ किलो गांजा मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी महादेव पंडित जवदे वय ३८ वर्षे आणि त्याचा साथीदार शुभम बाबासाहेब काळे (वय २९ वर्षे, दोघे रा.वाकडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांना जागीच ताब्यात घेतले. आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीरपणे गांजाची साठवणूक व विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार शहाजी बाबासाहेब आंधळे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुरनं ६३४/२०२६, NDPS कलम २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांजा

ही कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोसई मनोज अहिरे, पोसई/विकास पाटील, पोलीस हवालदार शहाजी आंधळे, रवी शेळके, अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे, हरी धायतडक, संदीप ढाकणे, सुमित करंजकर, नवनाथ शेकडे, गणेश फाटक, राहुल गायकवाड, नारायण डमाळे, गणेश जाधव, चालक पोलीस हवालदार खंडागळे मेजर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा कांबळे व होमगार्ड यांनी केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार पो.नि.प्रताप दराडे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही मध्यरात्री करण्याचे नियोजन असल्यामुळे व कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून यावेळी मोठ्या बंदोबस्तात सदरची कारवाईची मोहीम यशस्वी करण्यात आली.

गांजा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गांजा
गांजा
गांजा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गांजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!