आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
एकादशी


नेवासा – हजारो वारकरी भक्तांच्या मांदियाळीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी निर्मितीच्या आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने ग्रंथराज रचनास्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील “पैस” खांबाचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले

आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने पहाटे पासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.पहाटे चार ते पाच या वेळेत विनोद नळकांडे व त्यांच्या पत्नी सुवर्णा विनोद नळकांडे,तसेच अनंता नळकांडे सविता अनंता नळकांडे सत्वशीला दिगंबर नळकांडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी अनेक भाविक उपस्थित होते तसेच मंदिराच्या वतीने माऊली सेवेकरी आशिष कावरे विष्णू जाधव गोरख भरात बाजीराव शेळके व विद्यार्थी यांनी आरतीचे वेळी जय घोष केला यजमान नळकांडे कुटुंबाचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला पहाटेच्या सुमारास आरती व पसायदान म्हणण्यात आले पहाटेच्या पूजेला देखील मंदिरामध्ये मोठी गर्दी झाली होती

एकादशी

सायंकाळी सौ पूजा व अथर्व वडापूरकर तसेच श्री व सौ गणेश सुरडे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली व प्रसाद वाटप करण्यात आले

यावेळी आलेल्या भाविकांचे संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त ह भ प देविदास महाराज म्हस्के कैलास जाधव रामभाऊ जगताप,कृष्णाभाऊ पिसोटे, विश्वास मामा गडाख माऊली शिंदे, भगवान राव सोनवणे व जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे यांच्यासह भक्त मंडळींनी स्वागत केले.यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी दर्शन बारीची व्यवस्था मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली होती.भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून सेवेकरी मंडळातील सदस्यांनी विशेष भूमिका बजावली. मंदिर प्रांगणात केळ्यांचे तसेच साबुदाणा खिचडीचे वारकऱ्यांना वाटप केले

एकादशी



यानिमित्ताने तालुक्यातील सुमारे शंभर पेक्षा जास्त दिंड्या पंढरपूरला गेलेल्या असतानाही अनेक छोट्या मोठ्या दिंड्यांनमाऊली मंदिरात हजेरी लावली होती. त्यात बाल वारकऱ्यांच्या दोन-तीन दिंड्या व वकील संघाचे निघालेली स्वतंत्र दिंडी वारकऱ्यांमध्ये मध्ये आकर्षणाचे केंद्र ठरले

आषाढी एकादशी असल्याने नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला

एकादशी

एकादशीच्या निमित्ताने केळी,रताळी,बटाटे,आंबे या फळांची आवक मोठया प्रमाणात झाली होती

तर नेवासा शहरातील संत तुकाराम महाराज मंदिर, विठ्ठल रुख्मिणी मंदिर,श्री मोहिनीराज मन्दिर येथे ही दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यानिमित्ताने असंख्य दिंड्यांनी
माऊली मंदिरात हजेरी लावली होती.

आषाढी एकादशी परत गावी जात असताना विदर्भ मराठवाड्यातील अनेक दिंड्यांनी आज पैस खांबाचे दर्शन घेतले

एकादशी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एकादशी
एकादशी
एकादशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एकादशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!