
नेवासा (प्रतिनिधी) सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुका वकील संघाचे देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी दिंडी काढण्याचे संकल्पनेला युवा वकिलांनी साथ दिल्याने आज ३ रे वर्षी दिंडीचे उत्साहात नियोजन केले. रामकृष हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम चे जयघोषाने पूर्ण नेवासा नगरी दुमदुमली. यावेळी अँड रेणुका कोकाटे यांनी त्यांचे घराजवळ चहाचे नियोजन केले, तर बस स्टँड जवळ अँड बी एस शिरसाठ यांनी चहाचे नियोजन केले.

नगरपंचायत चौकात नगराध्यक्ष डॉ घुले यांच्यासह त्यांचे सोबती नगरसेवक यांनी जल्लोषात स्वागत करून वकील संघाचे अध्यक्षांचा सन्मान केला. त्यानंतर पैस खांब मंदिर परिसरात रिंगण सोहळा पार पडला. अँड के टी शिंदे यांनी सुमधुर आवाजातून अनेक अभंग म्हणून दिंडी सोहळ्यात चैतन्य निर्माण केले. यावेळी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अभंग यांनी आभार व दिंडी सोहळ्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. दिंडीचे समारोपनंतर अँड उत्कर्षा मोटे यांनी फराळाचे नियोजन केले. यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष यांनी सर्व वकील बंधू भगिनींचे आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







