घोडेगाव — सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका एकवीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या बाबत सविस्तर माहिती अशी की पिडीत तरुणी ही शिक्षण घेत असताना तिचा पाठलाग करत तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर वेळोवेळी भेटुन दोघांचे फोटो काढले त्यानंतर आरोपी क्रमांक एक ने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इच्छा नसतानाही तिचे सोबत अहील्यानगर येथे एका लाॅजवर नेवुन बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्या ठिकाणी देखील पुन्हा फोटो काढले. त्यानंतर मात्र फिर्यादी यांनी आरोपी सोबत फोनवर बोलणे टाळले असता आरोपी क्र. दोन, तीन चार ने धमकावून आरोपी एक याच्याशी बोलण्यासाठी भाग पाडले.

फिर्यादी यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी पुणे येथे गेल्यावर आरोपी एक ने पुन्हा एकदा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी क्र. ५ च्या मदतीने आळंदी येथे जाऊन बळजबरीने लग्न केले. त्यानंतर त्यांच्या मामाच्या घरी शेवगाव येथे गेले असता त्या ठिकाणी आरोपी दोन तीन यांनी धमकावत तुला त्याच्या सोबतच रहावे लागेल नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी या पुणे येथे घरी आल्यावर पुन्हा एकदा लाॅजवर नेवुन बळजबरीने शारीरिक संबंध केले.

दोघांचे काढलेले फोटो तिच्या आईवडिलांच्या व नातेवाईकांच्या फोनवर पाठवुन ते व्हायरल केले. आरोपी एक ते चार यांना समजावून सांगत असताना आरोपी क्र. सहा याने आपल्या नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली. तसेच दि. ३० रोजी व्हाटसप, इंस्टाग्राम वर स्टेटस ठेवुन व्हायरल करत असल्याचे नमूद फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार आरोपी दिपक बाळासाहेब देवकर, बाळासाहेब जनार्दन देवकर, रुख्मिणी बाळासाहेब देवकर, सत्यम बाळासाहेब देवकर, दिपक यांच्या आत्याची मुलगी सिध्दी कोळगे,दिपक याचे आजोबा,

जनार्दन दादा देवकर सर्व राहणार शहापूर यांच्या विरोधात बिएन एस चे कलम ६३(१), ६४,६४(एम), ६९,७५(१) (२), ७८(१), ४९,८७,३५२,३५१(२) (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







