आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
नाशिक


अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड व नगर शहर या मतदारसंघातील विशेष सखोल निरीक्षण मोहीम अंतर्गत सुरू असलेले कामकाज 2 ऑगस्ट रोजी शंभर टक्के पूर्ण झालेले आहे अशी माहिती उपजिल्हानिवडणूक अधिकारी श्री सुनील गाढे यांनी दिली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे कामकाज सुरू असून त्यामध्ये जिल्ह्यातील कर्जत जामखेड व नगर शहर या मतदारसंघांनी मुदत संपण्यापूर्वीच काम पूर्ण करून बाजी मारलेली आहे.

अहिल्यानगर


कर्जत जामखेड मतदार संघामध्ये एकूण मतदार 350524 असून 319245 मतदारांचे फॉर्म digitize करण्यात आले असून.उर्वरित 31279 मतदारांपैकी 13655 मतदार मयत असून दुबार मतदार 4049 इतके आहेत.तर उर्वरित मतदार हे स्थलांतरित असल्याचे आढळून आले आहे.
नगर शहर मतदारसंघात एकूण 315264 मतदार असून त्यापैकी 245305 मतदार यांचे संगणकी करण चे काम पूर्ण झाले असून उर्वरित असंकलीत मतदारांमध्ये 14625 मतदार मयत तर 6505 मतदार हे दुबार असल्याचे आढळून आले आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात 356 BLO , तर 37 पर्यवेक्षक , व 43 सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी या कामी परिश्रम घेतले असून नगर मतदारसंघात 297 BLO ,30 पर्यवेक्षक व 52 सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी सदर काम पूर्ण करण्याकरिता मेहनत घेतली आहे.

अहिल्यानगर


कर्जत जामखेड व नगर शहर मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी अनुक्रमे श्री नितीन पाटील व श्री सुधीर पाटील यांचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी अभिनंदन केले असून त्यांचे समवेत काम करणारे सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी ,पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे देखील जिल्हाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

अहिल्यानगर


सुधारित वेळा पत्रकानुसार प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी 17 ऑगस्ट रोजी होणार असून दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 पर्यंत असून 15 ऑक्टोबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहे.तर अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी ही 19 ऑक्टोबर ला होणार आहे अशी माहिती उपजिल्हानिवडणूक अधिकारी श्री सुनील गाढे यांनी दिली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील उर्वरित मतदार संघात देखील 95 टक्के पेक्षा अधिक कामकाज पूर्ण झाले असून ते देखील जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांचे मार्गदर्शनाखाली लवकरच 100% पूर्ण होतील अशीही माहिती पुढे त्यांनी दिली आहे.

अहिल्यानगर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अहिल्यानगर
अहिल्यानगर
अहिल्यानगर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!