आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सौंदाळा

सौंदाळा : जिल्ह्यातील शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर असलेल्या मौजे सौंदाळा येथील जिल्हा परिषद शाळेस आमदार श्री. विठ्ठलराव लंघे यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व शाळेच्या विकासकामांची माहिती घेतली. शाळेच्या वाढत्या पटसंख्येची आणि सुविधांची गरज लक्षात घेऊन आमदार लंघे यांनी शाळेसाठी दोन नवीन शाळा खोल्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी दिली.

सौंदाळा

यावेळी बोलताना आमदार लंघे म्हणाले, “सौंदाळा हे आदर्श गाव आहे. त्यामुळे येथील शाळाही आदर्श आहे. माझ्याकडे सौंदाळा शाळेत प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांचे पालक येतात. यावरूनच शाळेची गुणवत्ता लक्षात येते.”

शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ होणार असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सौंदाळा गावाला मुख्यमंत्री पंचायतराज अभियान. आदिशक्ती. आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान हे तीन पुरस्कार एका वर्षात मिळाल्याने सरपंच शरदराव आरगडे व ग्रामपंचायत अधिकारी सौं. प्रतिभा पिसोटे यांचा आमदार लंघे यांनी सत्कार केला.

सौंदाळा

यावेळी प्रास्ताविक आदर्श शिक्षक अशोक पंडित यांनी केले.आभार मुख्याध्यापक पोपट घुले यांनी आभार मानले.
यावेळी केंद्र प्रमुख सीताराम आरगडे.बाळासाहेब आरगडे. सचिन आरगडे. बंडु आरगडे.मंजु आढागळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सौंदाळा
सौंदाळा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सौंदाळा
सौंदाळा
सौंदाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सौंदाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!