आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मारहाण

नेवासा : नेवासा तालुक्यात जुन्या कट मारल्याच्या वादातून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीत झाले. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात 7 नामधारी आणि 4-5 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडील FIR नुसार, तक्रारदार आसिफ शेख यांचा भाऊ जमील शेख आणि मित्र सोहेन हरून शेख आणि सादिक हमीद शेख हे 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10:10 वाजता नेवासा रोड येथील काटे महाराज आश्रमाजवळून जात होते. यावेळी आरोपींनी त्यांना अडवून जुन्या वादावरून मारहाण केली.

मारहाण

आरोपींची नावे: राम संजय शिरसाठ, लखन संजय शिरसाठ, आदित्य उर्फ पांड्या कनगरे, आरिफ उर्फ बब्बू पठाण, आकाश उर्फ अक्षय चक्रनारायण, अनुझ उर्फ याकूब अनिल चांदणे, यश सदिप चांदणे व 4-5 अनोळखी.

आरोपी हातात तलवार, लाकडी दांडे आणि लोखंडी रॉड घेऊन आले होते. मारहाण करताना “तुम्हाला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मारहाण

जखमींना रुग्णालयात दाखल
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जमील शेख व त्यांच्या मित्रांना प्रथम आत्मदिप हॉस्पिटल, नेवासा फाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी साईदिप हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे.

पोलिसांचा तपास सुरू
नेवासा पोलीसांनी आसिफ शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनेचा पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे.

मारहाण
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!